आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सोडत सन २०२६-२७ right to education online process 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सोडत सन २०२६-२७ right to education online process 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत (लॉटरी) सोमवार दि. ०६-०४-२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता काढणे नियोजित आहे. तरी आपल्यास्तरावरुन मा. संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांचेशी संपर्क साधून महात्मा फुले सभागृह येथील बैठकीच्या व्यवस्थेबाबत, इंटरनेट सुविधेबाबत तसेच अल्पोपहार याबाबतचे नियोजन करण्यात यावे. सोडत (लॉटरी) साठी पुणे जिल्हयातील जवळच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या १० मुलांना सोडतीच्या दिवशी उपस्थित ठेवण्यात यावेत. तसेच उपस्थित मुलांचे स्वागत करण्यासाठी गोष्टीचे पुस्तक, पेन व चॉकलेट भेट देण्यासाठी उपलब्ध करावेत.

तसेच आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेची ऑनलाईन सोडत बाबत पत्रकार, संस्थाचालक / सामाजिक संघटना तसेच पालक यांना उपस्थित राहणेबाबत आपल्यास्तरावरुन कळविण्यात यावे. सदरचे कामी आपण स्वतः याबाबत दक्ष राहून संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्याच्या दृष्टीने सर्वोत्त उचित कार्यवाही करावी. याकामी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा / हायगई होणार नाही याची दक्षता घ्यावी.

 

Related posts:

Leave a Comment