केंद्र शासनाच्या मिशन कर्मयोगी Integrated Government Online Training (IGOT) अंतर्गत दिनांक २ ते ८ एप्रिल, २०२६ या कालावधीत “साधना सप्ताह” राबविण्याबाबत
संदर्भः सामान्य प्रशासन विभाग यांचे क्र. संकीर्ण-२०२६/प्र.क्र.०५/प्रशि-५, दिनांक २५.०३.२०२६ रोजीचे पत्र.
महोदया,
उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, केंद्र शासनाच्या मिशन कर्मयोगी Integrated Government Online Training (IGOT) अंतर्गत भारत सरकार, क्षमता विकास आयोग (CBC) व “कर्मयोगी भारत” यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २ ते ८ एप्रिल, २०२६ या कालावधीत “साधना सप्ताह” कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमांतर्गत GOT (Karmayogi) पोर्टलवरील कामगिरीच्या आधारे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालय प्रमुखांचा मे, २०२६ मध्ये आयोजित “TECH-वारी २.०” कार्यक्रमामध्ये सामान्य प्रशासन विभागकडून प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
२. साधना सप्ताहाच्या प्रभावी व यशस्वी अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी:-
१) आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी GOT कर्मयोगी पोर्टलवरील सोबत जोडलेल्या यादीतील कोर्सेस पूर्ण करावेत. पूर्ण केलेल्या कोर्सेसचा एकूण कालावधी किमान ४ तास असणे आवश्यक आहे.
२) वरील कोर्सेस दि. २ एप्रिल ते दि. ८ एप्रिल, २०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात यावेत.
३) आपल्या अधिनस्त कार्यालयांतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना “साधना सप्ताह” अंतर्गत आयोजित कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी आवश्यक त्या सविस्तर सूचना देण्यात याव्यात.
३. राज्यात सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपण वैयक्तिक लक्ष देऊन सक्रीय सहभाग नोंदवावा, ही विनंती.





![Release of Admit Cards for the Candidates of National Eligibility cum Entrance Test [NEET (UG)]-2026...](https://dainikexam.in/wp-content/uploads/2026/04/Screenshot_2026_0426_220205-150x150.jpg)




