“२८ सप्टेंबर हा दिवस “आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन” म्हणुन साजरा करणेबाबत international information right day
संदर्भ – शासन निर्णय क्र. केमाअ २००८/प्र.क्र.३७८/०८/सहा, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई-४०००३२ दि.२० सप्टेंबर, २००८.
महोदय,
उपरोक्त विषयांकित प्रकरणो संदर्भिय शासन निर्णयान्वये “दिनांक २८ सप्टेंबर हा दिवस राज्य पातळीवर प्रतिवर्षी “माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा करण्यात यावा. या दिवशी शालेय शिक्षण विभाग तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सर्व शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये माहितीचा अधिकार या विषयावर आधारित प्रश्नमंजूषा, चित्रकला, निबंध व वक्तृत्व इ. सारख्या स्पर्धा तसेच चर्चासत्र व व्याख्यानमाला आयोजित कराव्यात. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व अशासकीय समाजसेवी संस्थांच्या मदतीने समाज कार्यकर्त्याकरिता व इच्छुक गटांकरिता भित्तीपत्र स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चर्चासत्र, व्याख्यानमाला इ उपक्रम आयोजित करावेत या उपक्रमांसाठीच्या पारितोषिकांची व्यवस्था स्थानिक पातळीवर लायन्स क्लब, रोटरी क्लब अशा विविध समाजसेवी संस्थांच्या सहयोगाने करण्यात यावी. अशा प्रकारे दिनांक २८ सप्टेंबर हा दिवस राज्य पातळीवर प्रतिवर्षी “माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा करुन माहितीच्या अधिकाराबाबत समाजात व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यास दिनांक २८ सप्टेंबर, २००८ पासून सुरवात करावी. जिल्ह्यात हे उपक्रम व्यापक पातळीवर राबविण्याची जबाबदारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात येत आहे. माहिती अधिकार दिनानिमित्त जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी शासनास दरवर्षी ऑक्टोबर अखेर सादर करावा” असे नमुद आहे.
वरील वस्तुस्थिती विचारात घेऊन या वर्षी माहिती अधिकार दिन सोमवार, दिनांक २८ सप्टेंबर, २०२६ रोजी “माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा करण्यात यावा, संदर्भाधीन दिनांक २० सप्टेंबर, २००८ रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या सूचनांचे पालन करुन आपल्या अधिनस्त कार्यालयांना “माहिती अधिकार दिन” साजरा करण्याबाबत सुचित करावे व सदर प्रकरणी केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल शासनास व कार्यालयास










