Dropbox मधील विद्यार्थी प्रवेश घेतलेल्या शाळेमध्ये Import करून Active for Import शून्य करणेबाबत dropbox active for import
संदर्भ: भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. D.O.No.२३-६/२०२६-Stats दि. १४ जुलै, २०२६.
उपरोक्त संदर्भिय विषयाच्या अनुषंगाने यु-डायस प्लस प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करणेची कार्यवाही शाळा स्तरावरती सुरू आहे. दि. ०१/०९/२०२६ रोजीच्या अहवालानुसार सन २०२६-२७ या वर्षामध्ये ११,५१,५२५ विद्यार्थी Dropbox मध्ये Active for Import साठी उपलब्ध आहेत. सन २०२५-२६ व २०२६-२७ मध्ये नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती तुलना केली असता पूर्व प्राथमिक, इयत्ता १ली, इयत्ता ४थी, ५वी, ८वी, व इयत्ता ११वी मध्ये जास्त प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणी/Import करणे बाकी असल्याचे दिसून येत आहे.
केंद्र शासनाकडून यु-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षक यांची माहिती अद्ययावत करण्यासाठी दि. ३० सप्टेंबर, २०२६ पर्यंत वेळ दिली आहे. याबाबत आपणास कळविण्यात येते की, आपल्या स्तरावरून Dropbox मधील विद्यार्थी प्रवेश घेतलेल्या शाळेमध्ये Import करून घेण्याच्या अनुषंगाने शाळेच्या मुख्याध्यापकांना कळविण्यात यावे. तालुका/केंद्र स्तरावर Dropbox मधील Active for Import साठी असलेले विद्यार्थी Import करून घेण्याचे अनुषंगाने कॅम्प आयोजित करण्यात यावे. सदर कार्यशाळेला जास्त विद्यार्थी Active for Import साठी आहेत अशा शाळेच्या मुख्याध्यापकांना कॅम्पसाठी माहितीसह उपस्थित राहण्याकरिता कळविण्यात यावे. जिल्हा स्तरावरून Active for Import साठीचे विद्यार्थी शून्य करण्याचे अनुषंगाने दररोज आढावा घेण्यात यावा.
Dropbox मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची शाळानिहाय व विद्यार्थ्यांच्या नावासह माहिती जिल्हा संगणक प्रोग्रामर व तालुक्या स्तरावरील MIS-Coordinator व ऑपरेटर यांच्याकडे यु-डायस प्लस प्रणालीमध्ये उपलब्ध आहे. यु-डायस प्लस प्रणालीमध्ये Dropbox मधील विद्यार्थ्यांना Import करतांना शाळेच्या मुख्यध्यापकांना तांत्रिक अडचणी येत असल्यास जिल्हा व तालुक्याचे संगणक प्रोग्रामर, MIS-Coordinator व ऑपरेटर यांच्याकडे संपर्क
साधावा. जिल्हा व तालुका स्तरावरून अडचण सोडविल्या जात नसल्यास राज्य कार्यालयास लेखी कळविण्यात यावी.
जिल्हा कार्यालयामध्ये समग्र शिक्षांतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे काम पहाणारे पर्यायी शिक्षण समन्वयक कार्यरत आहेत. त्यांच्या मदतीने Dropbox मधील Dropout विद्यार्थ्यांच्या माहितीची पडताळणी करून प्रवेश घेतलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना Import करण्याबाबत संबंधित मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यात यावे.
यु-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती अंतिम झाल्यानंतर सदर माहितीच्या उपयोग विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी करण्यात येणार आहे. प्रामुख्यांने संच मान्यता, RTE प्रवेश, इयत्ता ११वी ऑनलाईन प्रवेश, Mid Meal Scheme, पाठ्यपुस्तक, गणवेश, समग्र शिक्षा, पी.एम.श्री, इत्यादी योजनांच्या अंमलबजावणीसाठी करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने शाळांनी भरलेली माहिती वस्तुनिष्ट अचूक असणे आवश्यक आहे.
सोबत : Dropbox अहवाल.











