शाळांची वार्षिक तपासणी varshik tapasni paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शाळांची वार्षिक तपासणी varshik tapasni paripatrak 

संदर्भ :-

१) दि. २२/०८/२०२५ च्या ऑनलाईन बैठकीमध्ये दिलेल्या सुचना

२) संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा-२५/शाळा तपासणी/एस-१/१७०८०९२, दि.०५/०२/२०२६

वरील विषयाच्या अनुषंगाने आपल्या विभागातील शाळांची १०० टक्के वार्षिक तपासणी पूर्ण झाल्याचे दिसून येत नाही. आपल्या अधिनिस्थ सर्व शाळेची वार्षिक तपासणी पूर्ण करून वार्षिक तपासणीचा अहवाल दि.३१/०३/२०२६ पर्यंत संचालनालयास सादर करण्याबाबत संदर्भ क्र.२ अन्वये कळविण्यात आले होते.

अद्यापही आपल्या विभागातील शाळांची १०० टक्के वार्षिक तपासणीचा अहवाल संचालनालयास अप्राप्त असल्याचे दिसून येते. शाळा तपासणी अंती आढळलेल्या चांगल्या बाबी बाबत स्वतंत्र अहवाल सादर करावा. तसेच शाळा तपासणी अंती निदर्शनास आलेल्या भौतिक व गुणवत्ता विषयक उणीवाच्या अनुषंगाने उपाययोजना बाबत स्वतंत्र अहवाल देखील सादर करावा.

तरी पुनःश्च आपणास कळविण्यात येते की, आपल्या विभागातील शाळांची १०० टक्के वार्षिक तपासणीचा अहवाल सोबत दिलेल्या विवरण पत्रामध्ये तात्काळ संचालनालयास सादर करण्यात यावा.

Related posts:

Leave a Comment