सामान्य प्रशासन विभाग (खुद्द) मधील नादुरुस्त निर्लेखित करावयाच्या संगणकाबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती nadurust nirlekhan shasan nirnay 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सामान्य प्रशासन विभाग (खुद्द) मधील नादुरुस्त निर्लेखित करावयाच्या संगणकाबाबत अनुसरावयाची कार्यपध्दती nadurust nirlekhan shasan nirnay 

वाचा :- सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक, मातंस/नस्ती ०७/प्र.क्र.८९/३९, दिनांक ०१.०८.२०११

शासन परिपत्रक :-

सामान्य प्रशासन विभाग (मा. तं) दिनांक ०१ ऑगस्ट २०११ च्या शासन निर्णयानुसार संगणक, प्रिंटर लॅपटॉप, सर्व्हर व इतर सर्व आयटी उपकरणांचे वयोमान ५ वर्षे निश्चित करण्यात आलेले आहे. अशी उपकरणे कालबाहय झाल्याने निर्लेखित करण्याबाबत सूचना आहेत. संगणक, प्रिंटर हयांची प्राथमिक अवस्थेमधील दुरुस्ती महाआयटी कडून करण्यात येते. संगणक सामुग्री दुरुस्त होणे शक्य नसल्यास विभागातील कार्यासनांकडून असे संगणक कार्यासन २४ कडे निर्लेखनासाठी जमा करण्यात येतात.

२. सामान्य प्रशासन विभाग (खुद्द) मधील जे संगणक दुरुस्त होणे शक्य नाहीत असे संगणक कार्यासन २४ कडे जमा करण्यापूर्वी संबधित कार्यासनाच्या अधिकारी/कर्मचारी यांनी महाआयटीच्या संगणक तज्ञाकडून संगणकाच्या हार्डडिस्क मधील संपूर्ण डाटा पेनड्राईव्ह वर घेतल्यानंतर तसेच संगणकामधील संपुर्ण डाटा संगणक तज्ञाकडून काढुन टाकल्याबाबत प्रमाणित केल्यानंतर असे संगणक कार्यासन २४ कडे निर्लेखित करण्यासाठी जमा करण्यात यावेत. कार्यासनामधील अधिकारी/कर्मचारी यांनी संगणक ताब्यात घेताना त्यातील डाटा संगणक तज्ञाकडून काढुन घेतल्याचे खातरजमा करुन असे संगणक निर्लेखनासाठी ताब्यात घ्यावेत.

३. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२००१०३१५२१३०१७०७ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Related posts:

Leave a Comment