सुधारित वेतनसरंचनेत वेतन घेणारा राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच असुधारित वेतन सरंचनेत (६ व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणा-या राज्य अशासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना मंजूर करण्यात येणा-या महागाई भत्याच्या दरात दि. १ जुलै, २०२४ पासून सुधारणा करण्याबाबत शालार्थ मध्ये टॅब उपलब्ध करुन देण्याबाबत dearness allowance shalartha tab 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सुधारित वेतनसरंचनेत वेतन घेणारा राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच असुधारित वेतन सरंचनेत (६ व्या वेतन आयोगानुसार) वेतन घेणा-या राज्य अशासकीय व इतर पात्र कर्मचा-यांना मंजूर करण्यात येणा-या महागाई भत्याच्या दरात दि. १ जुलै, २०२४ पासून सुधारणा करण्याबाबत शालार्थ मध्ये टॅब उपलब्ध करुन देण्याबाबत dearness allowance shalartha tab 

संदर्भ-१ वित्त विभाग शासन निर्णय क्र. मभवा-१३२४/प्र.क्र.२४/सेवा९ दि.२५ फेब्रुवारी, २०२५

२ शासन पत्र क्र.संकीर्ण-२४१९/४२-१९/अर्थसंकल्प दि.२५ फेब्रुवारी, २०२५

३. मा. आयुक्त, शिक्षण कार्यालयाचे दिनांक २५ फेबुवारी, २०२५

उपरोक्त संदर्भ क्रं१ अन्वये १ जुलै, २०२५ पासून महागाई भत्ता ५० टक्के वरुन ५३ टक्के करण्यात आला असून दिनांक १ जुलै, २०२४ ते ३१ जानेवारी, २०२५ या कालावधीची थकबाकीची रक्कम माहे फेब्रुवारी, २०२५ च्या वेतनासोबत रोखीने देण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करुन देणेबाबत निर्देश देण्यात आले होते तथापि, माहे फेब्रुवारी, २०२५ ची नियमित वेतनदेयके पूर्वीच कोषागारात सादर होऊन मंजूरीबाबतची प्रक्रिया पूर्ण झालेने राज्यातील काही जिल्हयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांना महागाई भत्ता वाढ व थकबाकी अदा करणे शक्य झाले नाही त्यामुळे जुलै, २०२४ ते फेब्रुवारी, २०२५ या आठ महिन्याची वाढीव महागाई भत्याची थकबाकी माहे जून, २०२५ च्या वेतनासोबत अदा करण्यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये टॅब उपलब्ध करुन देणेबाबत काही अधीक्षक, वेतनपथक प्राथमिक यांचेकडून विनंती करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने दिनांक ३०/६/२०२५ पर्यत टॅब उपलब्ध करुन देणेत येत आहे. त्यानुसार तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी तसेच यापुढे महागाई भत्याची थकबाकी अदा करण्याकरिता टॅब उपलब्ध करुन देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.

Related posts:

Leave a Comment