एकाच कॅम्पसमध्ये सुरू असलेल्या (दोन किंवा अधिक शाळा) शाळांच्या एकत्रिकरणाच्या प्रस्तावास मान्यता देणेबाबत shala ekatrikaran paripatrak
संदर्भ-१. आपले पत्र क्र.७१४३४२/९७०/दि.२५/२/२०२६ प्राप्त दि.५/३/२०२६
२. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे शासन शुध्दीपत्रक क्र MSC-२१०४०/३/२०२५-MSC-(SM-५) दि.७/१०/२०२५
उपरोक्त विषयाबाबतच्या संदर्भीय पत्राव्दारे कोल्हापूर जिल्हयातील एकाच कॅम्पस मध्ये सुरू असलेल्या (दोन किंवा अधिक शाळा) शाळांची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, कोल्हापूर यांचेमार्फत आपणांस प्राप्त झालेली असून कोल्हापूर जिल्हयातील एकाच परिसरातील १२४ शाळांचे ६१ शाळांमध्ये विहित निकषांच्या आधारे शाळा एकत्रिकरण करणेबाबतचा प्रस्ताव आपण संचालनालयास मान्यतेसाठी सादर केलेला आहे.
संदर्भ क्र.२ शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांचे शासन शुध्दीपत्रक क्र क्र MSC-२१०४०/३/२०२५-MSC-(SM-५) दि.७/१०/२०२५ मधील मुद्दा क्र.१ नुसार एकाच आवारात मुले व मुलींच्या स्वतंत्र शाळा असल्यास त्यांचे तात्काळ एकत्रिकरण करून स्वतंत्र शाळांचे रूपांतरण सहशिक्षणाच्या शाळेत करण्यात यावे अशी तरतूद नमूद आहे.
सबब, सदर शासन निर्णयात नमूद अटी व शतीच्या अधीन राहून आपल्या विभागातील संदर्भीय प्रस्तावाच्या अनुषंगाने शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ पासून कोल्हापूर जिल्हयातील एकाच परिसरातील १२४ शाळांचे ६१ शाळांमध्ये एकत्रिकरण करणेबाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येत आहे. यापुढे संबंधित शाळांना एकच युडायस क्रमांक लागू राहील. तरी पुढील आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी.











