जिल्हा परिषद शाळांमधील मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या निर्लेखित करणेबाबत school class room nirlekhan

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हा परिषद शाळांमधील मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या निर्लेखित करणेबाबत school class room nirlekhan

U-DISE Data सन २०१७-१८ नुसार राज्यातील जिल्हा परिषदेच्या ८९६१ शाळांमध्ये १९,६६४ वर्गखोल्या मोडकळीस आलेल्या असल्याचे दिसून येते. या शाळांचे प्राधान्याने Preliminary Structural Audit करण्याबाबत या कार्यालयाच्या दि. २७ मार्च, २०१८ रोजीच्या पत्रान्वये समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत असलेल्या अभियंत्याना सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार शाळांचे Preliminary Structural Audit चालू आहे. याबाबतच्या माहितीच्या पडताळणी आधारे विहित पध्दतीचा अवलंब करुन मोडकळीस आलेल्या वर्गखोलींचे निर्लेखन प्राधान्याने करावे. मोडकळीस आलेल्या वर्गखोल्या निर्लेखित न केल्यामुळे शाळा इमारत पडल्यास दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे सदरिल वर्गखोल्या विहित पध्दतीचा अवलंब करुन निर्लेखनाची कार्यवाही त्वरित न केल्यास आपल्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल अशा स्पष्ट सूचना आपल्या अधिनस्त यंत्रणेस द्याव्यात.

शाळेमधील मूलभूत सुविधेची माहिती U-DISE+ या प्रणालीमार्फत ऑनलाईन भरण्याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. या प्रणालीमध्ये भरलेली माहिती अचूक असल्याबाबतचे खातरजमा करण्याबाबत सर्व संबंधितांना आदेशित करावे. जेणेकरुन अचूक माहितीच्या आधारे मूलभत सुविधेबाबतची गरज निश्चित करता येईल.

उपरोक्त बाबत आवश्यक कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.

Related posts:

Leave a Comment