सन २०२५-२६ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाबाबत sanchmanyata paripatrak
संदर्भ- आपले पत्र क्र.११७०/दि.१८/६/२०२६
उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये आपण पवित्र प्रणालीमधून सरळसेवेने ज्या पदवीधर शिक्षण सेवकांच्या नियुक्त्या झाल्या आहेत त्यापैकी काही शिक्षणसेवक सन २०२५-२६ च्या संचमान्यतेमध्ये अतिरिक्त झाले आहेत अशा शिक्षणसेवकांना उपशिक्षक पदावर समायोजित करता येईल अगर कसे याबाबत मार्गदर्शन होणेबाबत विनंती केलेली आहे
संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की,
१/- मंजूर पदवीधर शिक्षकांचे विषय निहाय वर्गीकरण न करता शाळेवर पदवीधर शिक्षक पद मंजूर असल्यास संबंधित शिक्षकास पूर्ववत त्याच शाळेवर कार्यरत ठेवता येईल किंवा दुस-या शाळेवर पदवीधर शिक्षक म्हणून समायोजन करता येईल.
२/- पवित्र पोर्टल मार्फत नियुक्त पदवीधर शिक्षकांना इतर पदवीधर रिक्त पदांवर समायोजित करता येईल. त्यांना पदावनत करता येणार नाही.
३/ याव्यतिरिक्तही पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरत असल्यास पदोन्नतीने पदवीधर शिक्षक पदी नियुक्त झालेल्या शिक्षकांना वेतन संरक्षण देऊन उपशिक्षक पदी कार्यरत ठेवता येईल.











