सन २०२६ चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आवेदने ऑनलाईन मागविण्याबाबत national teachers award 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२६ चे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार आवेदने ऑनलाईन मागविण्याबाबत national teachers award 

संदर्भ :- शासन पत्र क्र. पीटीसी-२०२६/प्र.क्र. ४६ अ/टीएनटी-४ दि. १९/०६/२०२६ पत्रासोबतचे सहपत्र सहसचिव (inst. & Trng.) / भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, कर्तव्य भवन नवी दिल्ली यांचे पत्र क्र. डी.ओ. १-३/२०२६ एनएटी दि.१५/०६/२०२६ चे पत्र व त्यासोबतचे सहपत्र.

उपरोक्त संदर्भाधिन शासन पत्रासोबतच्या सहपत्रात सहसचिव (inst. & Trng.) / भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, कर्तव्य भवन] नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय पुरस्कार २०२६ साठी मार्गदर्शक सूचना सुधारित केल्या आहेत. ऑनलाईन स्वःनामांकन करण्यासाठी दि. १५ जून, २०२६ पासून https://nationalawardstoteachers.education.gov.in या वेबपोर्टलवर स्वः नामांकन सुरू होणार आहे. त्यानुसार राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी प्राथमिक / माध्यमिक / उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी आपली स्वः नामांकने https://nationalawardstoteachers.education.gov.in वेबपोर्टलवर दिनांक १० जुलै २०२६ पर्यंत सादर करावयाची आहेत. तसेच अर्जदाराकडून स्वः नामांकने अंतिम करून दिनांक १३ जुलै, २०२६ पर्यंत सादर करावयाची आहेत. या

दिनांक १५ जून, २०२६ पासून वेबपोर्टलवर ऑनलाईन स्वः नामांकन करण्यासाठी लिंक सुरू करण्यात आली आहे. दिनांक १० जुलै, २०२६ पर्यंत इच्छुक शिक्षकांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी

ऑनलाईन स्वः नामांकने स्विकारण्याची मुदत आहे. तसेच अर्जदाराकडून स्वः नामांकने अंतिम करून दिनांक १३ जुलै, २०२६ पर्यंत सादर करावयाची आहेत. आपल्या जिल्हयातील स्थानिक वर्तमानपत्रातून मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी देण्यात यावी. सोबत प्रसिद्धी पत्रकाचा नमुना सादर केला आहे.

शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा (न.पा./म.न.पा./जि.प.), मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित शाळा (प्राथमिक/माध्यमिक/उच्च माध्यमिक) शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक ऑनलाईन स्वः नामांकन भरण्यास पात्र आहेत.

अधिक माहिती व सविस्तर सूचनांसाठी सोबत माहिती प्रत जोडली आहे. सहसचिव (inst. & Trng.)/ भारत सरकार, शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, नवी दिल्ली यांनी दिलेल्या सोबतच्या वेळापत्रकानुसार व मार्गदर्शक सूचनानुसार विहित वेळेत अंमलबजावणी करावी.

Related posts:

Leave a Comment