दिनांक ०८ ऑगस्ट, २०२६ रोजी होणा-या बालचित्रकला स्पर्धा आयोजनाबाबत balchitrakala competition paripatrak
संदर्भ संचालक, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांचे पत्र क्रमांक: क्रशिम २०२६/पाच/१०८४ दिनांक ०३/०७/२०२६
उपरोक्त संदभीय पत्रानुसार आपणांस कळविण्यात येते की, संचालक, महाराष्ट्र राज्य, कला शिक्षण मंडळ, मुंबई यांनी “शालेय विद्याव्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांच्या सर्जनशीलता बाढवण्यासाठी आणि महाराष्ट्राचा समृध्द सांस्कृतिक कलेचा वारसा जपण्यासाठी या स्पर्धेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. उपरोक्त संदभीय शासन निर्णयानुसार, महाराष्ट्र राज्य कल्ला शिक्षण मंडळामार्फत शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्राथमिक व गटशिक्षणाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली दिनांक ८ ऑगस्ट, २०२६ रोजी राज्यभरातील विविध केंद्र/शाळांवर बालचित्रकला स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.
संदर्भिय शासन निर्णयान्वये बालचित्रकला स्पर्धेचे प्रवेश शुल्क तसेच जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय बक्षीसांच्या रकमेत सन २०२५ पासून वाढ करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धा ही चार गटामध्ये घेतली जाणार असून इयत्ता १ ली ते इयत्ता १० वी पर्यतचे गटनिहाय विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतात. सदर स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी प्रति विद्याची रु २०/- अक्षरी रुपये चीस फक्त एवढे स्पर्धा शुल्क आहे. प्रति विद्याधी रु २०/- रक्कमेमधून ड्रॉइंग कागदाचा ११ X १५ इंच या आकाराचा खर्च रु.५/वजा करुन उर्वरित रक्कम रु.१५/- प्रति विद्यार्थी मंडळाकडे दिनांक ३१.०७.२०२६ पर्यंत ऑनलाईन जमा करावयाची आहे.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी व विद्यार्थ्यांच्या अधिकाधिक सहभागासाठी आपल्या अधिनस्त असलेल्या शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई, शिक्षणाधिकारी प्रार्यामक व गट शिक्षणाधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व माध्यमिक व प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना www.msbac.ac.in या संकेतस्थळावर कित्या https://balchitrakala२०२६, msbac.in या लिंकवर जाऊन जास्तीत जास्त शाळेची व विद्याथ्यांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करण्याच्या सूचना तातडीने देण्यात याव्यात.
स्पर्धेच्य गटनिहाय प्रश्नपत्रिका, संबंधित केंद्र/शाळांना ऑनलाईन (प्रत्येक केंद्र/शाळा करिता एक) उपलब्ध करुन देण्यात येतील. तद्नंतर संबंधित वर्गातील पर्यवेक्षकाने गटनिहाय प्रश्नपत्रिकेचा विषय फळ्यावर लिहून देणे बंधनकारक राहील.
स्पर्धकांना ११ X १५ इंच आकाराचा कागद ड्रॉईंग पेपर संबंधित केंद्र/शाळांनी पुरविणे आवश्यक राहील.
बालचित्रकला स्पर्धेकरिता जमा होणाऱ्या परीक्षा शुल्कातून केंद्र/शाळांनी ड्रॉइंग कागदाचा खर्च वजा करुन उर्वरित रक्कम मंडळाकडे जमा करावी.
स्पर्धकांनी नेमून दिलेल्या ठिकाणी, स्वतःचे रंग (क्रेऑन, जलरंग, पोस्टर कलर), ब्रश व इतर चित्रकला साहित्य यांचा वापर करुन दोन तासात चित्र पुर्ण करणे आवश्यक राहील.
बालचित्रकला स्पर्धा आयोजित करण्यासाठी विद्याध्यांकडून प्राप्त होणारे परीक्षा शुल्क महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या बैंक खात्यात जमा करण्यात येईल. जिल्हा व राज्य पातळीवर होणारा बक्षिसांवरील खर्च महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाकडून करण्यात येईल.
तालुका, जिल्हा, राज्य पातळीवरील स्पर्धेचे आयोजन –
तालुका पातळीवरील स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी संबंधित पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्याकडून खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात येईल.
समितीकडून प्रत्येक गटामधील २० चित्रे (२० X ४ गट एकूण ८० चित्रे) निवडण्यात येतील. निवडण्यात आलेली चित्रे दुसऱ्या दिवशी संबंधित जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिका-याकडे पाठविण्यात येतील. अशाप्रकारे जिल्हा स्तर व राज्य स्तर मूल्यमापन प्रक्रिया करण्यात येईल.
* बालचित्रकला स्पर्धा २०२६ आयोजनाचे वेळापत्रक pdf download
बालचित्रकला स्पर्धा २०२६ आयोजनाच्या अनुषंगाने शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी माध्यमिक/शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई, शिक्षणाधिकारी प्राथमिक व गट शिक्षणाधिकारी यांच्या माहितीकरिता महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांनी तयार केलेल्या मार्गदर्शन सूचना पुढील कार्यवाहीसाठी सोबत जोडल्या आहेत” असे संचालनालयास सूचित केलेले आहे. (सोबत संदर्भीय पत्राची प्रत जोडली आहे.)
त्यानुसार आपल्या विभागातील/जिल्हयातील सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्या संदभीय पत्रातील सूचना निदर्शनास आणून आयोजन करणेबाबत आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांस सदरील बाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संचालनालयास सादर करावा.










