माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षा फेब्रुवारी मार्च २०२७ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्याच्या तारखांबाबत ssc online application
महोदय,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) फेब्रुवारी – मार्च २०२७ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखांबाबतचे प्रकटन या पत्रासोबत जोडले आहे.
सदर प्रकटनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी त्यांच्या वृत्तपत्रात / प्रादेशिक बातम्यांचे वेळी
विनामूल्य प्रसिध्दी देण्याची व्यवस्था करावी, ही विनंती.










