DIKSHA Portal वरील निष्ठा अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन (ECCE) हा ऑनलाइन कोर्स लाभार्थीनी पूर्ण करणेसाठी आवश्यक कार्यवाही करणेबाबत diksha portal ecce paripatrak
संदर्भ: ।। विभाग प्रस्तुत कार्यालय यांच्याकडून बालशिक्षण विभागास फॉरवर्ड केलेला CIET, NCERT नवी दिल्ली यांचा मेल दि. २२ जुलै, २०२६
उपरोक्त संदर्भान्वये आपणास कळविण्यात येते की, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (NCERT), नवी दिल्ली यांच्यामार्फत निष्ठा अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन (ECCE) हा ऑनलाइन कोर्स विकसित केलेला आहे. सदर कोर्सचा कालावधी १५ तासांचा असून, “हा अभ्यासक्रम दर्जेदार पूर्व-प्राथमिक शिक्षण देण्यासाठी पायाभूत ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्ये प्रदान करतो. हा अभ्यासक्रम पायाभूत स्तरातील बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे खेळ-आधारित वातावरण तयार करण्यासाठी मार्गदर्शन करतो.
हा कोर्स DIKSHA Portal वर अपलोड केलेला असून आपल्या अधिनस्त DIET चे अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती आणि राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक शाळांतील पायाभूत स्तरावरील (इ. १ ली व २ री) शिक्षक, मुख्याध्यापक, D.El.Ed. अध्यापकाचार्य यांच्या साठी हा कोर्स लागू आहे.
सदर कोर्स हिंदी व इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी अभ्यासक्रमाची पहिल्या बॅचसाठी ३१ ऑगस्ट, २०२६ पर्यंत नोंदणी करता येईल. हा कोर्स पूर्ण करण्यासाठी अंतिम तारीख १५ सप्टेंबर, २०२६ अशी आहे.
कोर्स सुरू करण्यापूर्वीची पूर्वतयारीः
१. स्मार्टफोनवरून कोर्स पूर्ण करण्यासाठीः
(अ) DIKSHA App डाउनलोड करणे: Google Play Store वरून DIKSHA App डाउनलोड करून त्यामध्ये
नोंदणी करावी व संपूर्ण प्रोफाईल भरावी. प्रोफाईल भरताना आपल्या पदनामाशी तंतोतंत जुळणारे पदनाम उपलब्ध नसल्यास त्यास सर्वाधिक जवळचे पदनाम निवडावे.
(आ) DIKSHA Courses App डाउनलोड करणेः प्रोफाईल पूर्ण झाल्यानंतर Google Play Store वरून
DIKSHA Courses हे App डाउनलोड करावे. हिंदी व इंग्रजी भाषेतील कोर्सच्या लिंक्स पुढीलप्रमाणे आहेत.
खालीलपैकी कोणत्याही एका लिंकवर क्लिक करून कोर्समध्ये प्रवेश (Enroll) घ्यावा.
हिंदी – https://learning.diksha.gov.in/diksha/course.php?id=११२६§ion=२३७३
इंग्रजी – https://learning.diksha.gov.in/diksha/course.php?id=११२५§ion=२३७४
२. Laptop / Desktop (Browser) द्वारे कोर्स पूर्ण करण्यासाठीः
Browser द्वारे कोर्स पूर्ण करू इच्छिणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांनी www.diksha.gov.in या संकेतस्थळावर Login अथवा नोंदणी करावी. DIKSHA App मध्ये यापूर्वीच त्याच ई-मेल आयडीद्वारे नोंदणी केलेली असल्यास त्याच Login द्वारे प्रवेश करता येईल. अशा वेळी पुन्हा प्रोफाईल भरण्याची आवश्यकता नाही. प्रथमच Login करत असल्यास आवश्यक ती प्रोफाईल माहिती पूर्ण भरावी. Login केल्यानंतर मुख्य पृष्ठावरील “DIKSHA Courses” या Tab वर क्लिक करावे. त्यानंतर Search पर्यायामध्ये “NISHTHA ECCE Hindi” किंवा “NISHTHA ECCE English” कोर्स शोधून अथवा उपरोक्त लिंकवर क्लिक करून कोर्समध्ये प्रवेश घ्यावा. कोर्स यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर प्राप्त होणारे प्रमाणपत्र डाउनलोड करून जतन करावे.
करिता आपल्या स्तरावरून अधिनस्त DIET मधील अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती आणि राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक शाळांतील पायाभूत स्तरावरील (इ. १ ली व २ री चे) शिक्षक, मुख्याध्यापक, D.El.Ed. अध्यापकाचार्य यांना सदर कोर्ससाठी विहित कालावधीत नोंदणी करून कोर्स पूर्ण करण्यासाठी आदेशित करावे.










