शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील एमबीबीएस/बीडीएस (गट-अ) अभ्यासक्रम प्रवेशाच्या नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ व प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक neet exam
सुचना क्रमांक – १०
नीट युजी २०२६
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील एमबीबीएस/बीडीएस (गट-अ) अभ्यासक्रम प्रवेशाच्या नोंदणी प्रक्रियेस मुदतवाढ व प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक
संदर्भ : १) मेडीकल कॉन्सिलींग कमिटी, नवी दिल्ली, यांचेकडील प्रसिध्द सुधारित वेळापत्रक दिनांक १९/०८/२०२६ २) राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, सूचना क्र. ०८, दिनांक १४/०८/२०२६.
मेडीकल कॉन्सिलींग कमिटी, नवी दिल्ली (MCC) यांचेकडून अखिल भारतीय कोटा (All India Quota) समुपदेशन प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत एमबीबीएस/बीडीएस (गट-अ) अभ्यासक्रम प्रवेशाची उमेदवार नोंदणी प्रक्रियेची मुदत वाढविण्यात येत असून, प्रवेश फेरी १ चे वेळापत्रक सुधारित करण्यात येत आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करीता एमबीबीएस/बीडीएस (गट-अ) आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या केंद्रिभुत प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.
सुधारित वेळापत्रक – २ एमबीबीएस / बीडीएस (गट-अ) प्रवेश फेरी १
वरील वेळापत्रकात MCC / AACCC / केंद्र शासन / राज्य शासन / मा. न्यायालय यांच्या निर्देशानुसार बदल होऊ शकतो.
महत्त्वाच्या सूचना :
१. अखिल भारतीय अनिवासी (NRI) उमेदवारांनी त्यांच्या पात्रतेच्या पडताळणीसाठी Foreign Candidate Registration Portal वर २०/०८/२०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतरची प्रवेश प्रक्रिया वरील वेळापत्रकानुसारच राहील. पात्रता व नोंदणी प्रक्रियेसंदर्भात सुचना क्रमांक ०४ चे अवलोकन करावे.
२. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या सूचना क्र. ०३, दिनांक ०५/०८/२०२६ मध्ये नमूद केलेल्या इतर सर्व सूचना व अटी लागू राहतील. उमेदवारांनी सदर सूचनेचा नोंद घेऊन त्यानुसार कार्यवाही करावी.
या सूचनेच्या मराठी व इंग्रजी आवृत्तींमध्ये कोणतीही तफावत अथवा विसंगती आढळल्यास, इंग्रजी आवृत्ती अंतिम व बंधनकारक राहील.








