बालसंगोपन योजनेत एकल पाल्यांचे फॉर्म भरले जात नसल्याबाबत व एकल माता पाल्यांची स्वतंत्र्य नोंद शाळेत ठेवण्याबाबत balsangopan yojana ekal palya form paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बालसंगोपन योजनेत एकल पाल्यांचे फॉर्म भरले जात नसल्याबाबत व एकल माता पाल्यांची स्वतंत्र्य नोंद शाळेत ठेवण्याबाबत balsangopan yojana ekal palya form paripatrak 

संदर्भ :- १. श्री. हेरंब कुलकर्णी, राज्य निमंत्रक, साऊ एकल महिला समिती, म. रा., पुणे यांचे पत्र.

२. शिक्षण संचालक, (प्राथमिक व माध्य व उच्च माध्यमिक) यांचे पत्र क्र. प्राशिस/संकीर्ण-८०२/एकल माता दिनांक ०६.०३.२०२६

३. शासन पत्र क्र. क्रमांक:- संकिर्ण-२०२६/प्र.क्र.१८/एस.डी.५, दिनांक :- १८.०८.२०२६

महोदय,

उपरोक्त विषयांकीत प्रकरणी संदर्भ क्र. १ च्या पत्रामध्ये नमूद केलेनुसार संदर्भ क्र. २ च्या संयुक्त पत्रान्वये सूचना निर्गमित करुनही अनेक शाळांमध्ये एकल महिलांच्या पाल्यांचे फॉर्म भरले गेले नाहीत. केवळ योजनेची माहिती सांगितली आहे. करिता सर्व शाळांमध्ये सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचे फॉर्म न भरलेल्या विद्यार्थ्यांकडून फॉर्म भरून घेण्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा सांख्यिकीय आढावा घेण्याबाबत विनंती केली आहे.

तथापि संदर्भीय शासन पत्र क्र. ३ अन्वये श्री. हेरंब कुलकर्णी यांच्या संदर्भीय पत्र क्र. १ नुसार यासंदर्भात जिल्हानिहाय सांख्यिकीय आढावा घेवून जिल्हानिहाय कार्य अनुपालन अहवाल शासनास तात्काळ सादर करण्याबाबत सूचित केले आहे.

तरी, श्री. हेरंब कुलकर्णी यांच्या पत्रात नमूद प्रपत्रात माहिती संकलित होईल या दृष्टिकोनातून जिल्हानिहाय आढावा घेवून संकलित अहवाल या कार्यालयास तसेच शासनास पाठविण्यात यावा, ही विनंती.

Related posts:

Leave a Comment