शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत मोड्यूल विकसित करणेबाबत school leadership module development 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत मोड्यूल विकसित करणेबाबत school leadership module development 

संदर्भ – NCSL, निपा, नवी दिल्ली यांचे पत्र दि.04 ऑगस्ट 2026.

उपरोक्त विषयी कळविण्यात येते की, शालेय नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत NCSL, निपा, नवी दिल्ली यांच्या सूचनांनुसार मिपा-SLA संस्थेमार्फत सन 2019-20 ते 2025-26 या कालावधीत शालेय शिक्षण विभागाअंतर्गत कामकाज करणाऱ्या पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी यांच्या मार्फत एकूण 69 शैक्षणिक मॉड्यूल्स विकसित केलेले आहेत. सदर मोड्यूल्स NCSL, निपा, नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय पोर्टल https://ncsl.niepa.ac.in/मधील School Leadership Academy महाराष्ट्राच्या खालील वेबपेज वर प्रकाशित करण्यात आले आहे. https://ncsl.niepa.ac.in/schoolleadershipacademy/maharashtra/maharashtra repository module.php

सदर मोड्यूल्स निपा, नवी दिल्लीच्या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या मुख्याध्यापकांसाठीच्या PSLM या कोर्ससाठी संदर्भ साहित्य तसेच नेतृत्व विकसन संदर्भ साहित्य म्हणून या मोड्यूल्सचा वापर केला जातो.

संदर्भिय पत्रानुसार सन 2026-27 मध्ये शालेय शिक्षणाशी संबंधित मोड्यूल्स विकसित करावयाचे आहेत. तरी आपल्या अधिनस्त पर्यवेक्षीय यंत्रणेअंतर्गत केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, DIET अंतर्गत अधिव्याख्याता, ज्येष्ठ अधिव्याख्याता व प्राचार्य, महानगरपालिका अंतर्गत प्रशासन अधिकारी, शिक्षण उपनिरिक्षक, शिक्षण निरिक्षक तसेच राज्यस्तर शिक्षण विभागातील अधिकारी यांना सदर पत्र अवलोकनार्थ दाखवावे. ज्यांना मोड्यूल्स विकसन कामकाजात सहभागी व्हावयाचे आहे. त्यांना खालील ऑनलाईन लिंकवर दि.23/09/2026 पर्यंत नोंदणी करण्याबबाबत सूचित करावे व त्यातून त्यांचे साहित्य राष्ट्रीय पोर्टलवर प्रकाशित होण्यासाठी संधी उपलब्ध करुन द्यावी.

नोंदणी लिंक – https://forms.gle/EnR5PvfmPJS8jjjF9

Related posts:

Leave a Comment