विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करणेबाबत divyang labharthi yojana paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विशेष सहाय्य योजनेच्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी निधी वितरित करणेबाबत divyang labharthi yojana paripatrak 

महाराष्ट्र शासन दिव्यांग सक्षमीकरण विभाग, क्रमांक : दिव्यांग-२०२६/प्र.क्र.२९/कार्यासन-६ मंत्रालय, मुंबई दिनांक : २३ सप्टेंबर, २०२६

वाचा :

१. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे शासन निर्णय क्र विसयो-२०२६/प्र.क्र.०६/विसयो दि.२४ फेब्रुवारी, २०२६

२. दिव्यांग सक्षमीकरण विभागाचा शासन निर्णय क्र. दिव्यांग-२०२६/प्र.क्र.२३/कार्यासन ६, दि.२३ मार्च, २०२६

३. दिव्यांग सक्षमीकरण विभागाचा शासन निर्णय क्र. दिव्यांग-२०२६/प्र.क्र.२३/कार्यासन ६, दि.०६ एप्रिल, २०२६

४. वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२६/प्र.क्र.४०/अर्थ-३ दि.०९ एप्रिल, २०२६.

५. वित्त विभागाचे शासन परिपत्रक क्र. पुरक-२०२६/प्र.क्र.६१/अर्थ-३ दि.०३ जुलै, २०२६.

शासन ज्ञापन :-

विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे कामकाज दिनांक १ एप्रिल, २०२६ पासून दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून हाताळण्यात येत आहे. सन २०२६-२७ या वित्तीय वर्षाकरिता पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे निधी वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

२. संदर्भ क्र.२ मधील शासन निर्णयान्वये, आयुक्त, दिव्यांग सक्षमीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना “नियंत्रक अधिकारी” आणि सहाय्यक संचालक, दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना “आहरण व संवितरण अधिकारी” घोषित करण्यात आले आहे.

३. वित्त विभाग शासन निर्णय, दिनांक १२.०१.२०२३ नुसार सदरचे अर्थसहाय्य बिनशर्त आहे. वित्त विभाग, शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०२३/प्र.क्र.११०/२०२३/कोषा प्रशा-५, दि.१२.०३.२०२५ मधील परि.क्र. ९ अन्वये वैयक्तिक लाभार्थ्यांना प्रदान करावयाच्या प्रयोजनार्थ राज्याच्या एकत्रित निधीमधून रकमा आहरित करण्यात याव्यात.

दिव्यांग व्यक्तींकरीता विशेष सहाय्य योजने अंतर्गत अनुदानाची रक्कम VPDA खात्यावर वर्ग करून संवितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

४. सदर ज्ञापन वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन ज्ञापन महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेले असून त्याचा संगणक सांकेतांक २०२६०९२३१७१४१७९६३५ असा आहे. हे शासन ज्ञापन डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या नांवाने व आदेशानुसार,

Related posts:

Leave a Comment