अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरीत करण्याबाबत anganvadi sevika madatnis mandhan 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरीत करण्याबाबत anganvadi sevika madatnis mandhan 

महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग

शासन निर्णय क्रमांकः एबावि-२०२६/प्र.क्र.६०/का.६ (७-१६१६२९५) नवीन प्रशासन भवन, ३ रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०००३२.

दिनांक: २८ सप्टेंबर, २०२६

संदर्भ:- महिला व बाल विकास विभाग शा. नि. क्र. एबावि-२०२६/प्र.क्र.६०/का.६, दि. ०७.०४.२०२६, दि. ०८.०५.२०२६, दि. २७.०५.२०२६, दि. ३०.०६.२०२६, दि. २८.०७.२०२६ व दि. २७.८.२०२६.

शासन निर्णय :-

आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते.

२. सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे सप्टेंबर, २०२६ या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक-१ मधील प्रधान लेखाशीर्ष / उपशीर्ष / उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक-२ मध्ये नमूद विद्यमान तरतुदीमधून रकाना क्रमांक-४ मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये १७४.०० कोटी (अक्षरी रुपये एकशे चौ-याहत्तर कोटी फ़क्त) एवढा अतिरिक्त राज्य हिश्याचा आवश्यक निधी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

३. आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई यांनी वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचना विचारात घेऊन सदर निधी विहित पध्दतीने उपयोजनात कार्यवाही पूर्ण करावी.

४. सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्र. २४८/व्यय-६, दिनांक २५.०८.२०२६ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०९२८११३५४२६३३० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Related posts:

Leave a Comment