सन २०२६-२७ संच मान्यता कामकाजाबाबत sanchmanyata paripatrak
संदर्भ :- संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा-२०२६/संचमान्यता/२०२६-२७/२१५२४६६, दि.२४.०९.२०२६
उपरोक्त विषयान्वये सन २०२६-२७ च्या ऑनलाईन संच मान्यता दिनांक ३०.०९.२०२६ रोजी यु-डायस प्लस प्रणालीवर नोंद असलेल्या व आधार प्रमाणित विद्यार्थी संख्येच्या आधारे केल्या जाणार असल्याचे आपणांस यापूर्वी पत्र, Online VC, भ्रमणध्वनीद्वारे संदेश पाठवून कळविण्यात आले आहे.
संच मान्यतासाठी विद्यार्थी माहिती भरताना Division Aid, Medium, Stream, Inactive Division Pen Null या बाबी अचूक असणे आवश्यक आहे. सदर बाबी अचूक नसल्यास संबंधित शाळेची संच मान्यता Generate होऊ शकत नाही किंवा जितक्या विद्यार्थ्यांची माहिती योग्य आहे तितके विद्यार्थी ग्राह्य धरून संचमान्यता Generate होते. त्यामुळे सर्व संबंधित क्षेत्रीय अधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक यांनी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांच्या संचमान्यता दिनांक ३०.०९.२०२६ च्या नोंद असणाऱ्या पटानुसार माहे ऑक्टोंबर २०२६ च्या पहिल्या आठवड्यामध्ये निर्गमित करावयाचे असल्याने वरील सर्व माहिती दिनांक ३०.०९.२०२६ पूर्वी बरोबर असल्याची खात्री करून शाळा स्तरावरील विद्यार्थी माहिती दिनांक ०१.०१०.२०२६ रोजी वर्ग करण्याबाबतची कार्यवाही करणेसाठी संदर्भिय पत्र दि.२४.०९.२०२६ अन्वये आपणास कळविण्यात आले आहे.
सदर प्रकरणी सोबत जोडलेल्या तक्त्यामधील नमूद कारणांसाठी आपल्या विभागातील, जिल्हयातील शाळांच्या संचमान्यता निर्गमित होण्यासाठी क्षेत्रीयस्तरावरील कामकाज प्रलंबित असल्याने सदर शाळांच्या संच मान्यता पोर्टलवर उपलब्ध होणार नाही.
सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाच्या संच मान्यता मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे निर्देशानुसार दि.०९.१०.२०२६ पूर्वी निर्गमित करण्यात येणार आहे.
संच मान्यता या शालार्थ प्रणालीला संलग्न करण्यात आलेल्या असल्याने आपल्यास्तरावरील संचमान्यता विषयक कामकाज प्रलंबित राहून वेतन विषयक अथवा इतर अडचणी/तक्रार निर्माण झाल्यास आपण सर्वस्वी जबाबदार राहणार आहे, याची नोंद घ्यावी.
त्यानुषंगाने सोबत जोडलेल्या तक्त्यानुसार आपल्या विभागातील, जिल्हयातील ज्या शाळांचे संचमान्यताच्या अनुषंगाने कामकाज प्रलंबित आहे अशा शाळांबाबत आवश्यकती कार्यवाही दि.३०.०९.२०२६ अखेर पूर्ण करण्यात यावी. याबाबत कोणत्याही प्रकारची मुदत वाढ देण्यात येणार नाही. तसेच आपल्या स्तरावरून गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख व सर्व संबंधित मुख्याध्यापक यांना प्रलंबित कामकाज पूर्ण करणेसाठी तात्काळ निर्देश द्यावेत.










