रात्र शाळांतील दूबार शिक्षकांच्या वेतनाबाबत shikshak vetan paripatrak 

रात्र शाळांतील दूबार शिक्षकांच्या वेतनाबाबत shikshak vetan paripatrak 

संदर्भ :- १) शासनाचे समक्रमाकांचे दि. १३.१०.२०२५ चे पत्र.

२) शासनाचे समक्रमाकांचे दि. १२.०२.२०२६ चे पत्र.

३) शासन पत्र. क्रमांक: संकीर्ण-२०२५/प्र.क्र. ११८/टीएनटी-१, दि ०५.१०.२०२६

४) शासन पत्र.क्र समक्रमांक दि ०५.१०.२०२६

उपरोक्त विषयाबाबत संदर्भिय पत्र क्र.४ च्या शासन पत्राची प्रत सोबत जोडूण पाठविण्यात येत आहे.

शासनाने सदर पत्रान्वये, संदर्भीय क्र.३ चे शासन पत्र अधिक्रमित करुन, खालीलप्रमाणे सूचना निर्गमित केल्या आहेत.

१) रात्रशाळेत / दिवस दुबार शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांचे वेतन ऑफलाईन पद्धतीने अदा करण्याबाबत एकवेळीची बाब म्हणून शासन स्तरावरुन निर्देश देण्यात आले आहेत. तथापि दुबार शिक्षकांचे वेतन केवळ ऑनलाईन करण्याबाबतची कार्यवाही विहित मुदतीत करता न आल्याने त्यास मुदतवाढ देखील देण्यात आली आहे.

२) रात्रशाळेत /दिवस शाळेत दूबार काम करणऱ्या शिक्षकांचे वेतन ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याबाबत शालार्थ प्रणालीमध्ये आवश्यक तांत्रिक सुधारणा अद्याप पूर्ण झाली नसून ऑनलाईन वेतनासाठी करावयाच्या सुधारणा/सुविधा करण्यासाठी अधिकचा अवधी लागणार असल्याने सदर तांत्रिक व अपरिहार्य परिस्थिती विचारात घेता, या दुबार शिक्षकांचे माहे सप्टेंबर, २०२६ पर्यंतचे वेतन / इतर देयके ऑफलाईन अदा करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तथापि यापुढे विहित तरतुदीनुसार नियुक्त दुबार शिक्षकांचे वेतन ऑनलाईन पद्धतीनेच अदा होईल यासाठी शालार्थ प्रणालीमध्ये आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

उक्त शासन पत्रात दिलेल्या निर्देशानुसार रात्र शाळेत / दिवस शळेत दूबार काम करणाऱ्या शिक्षकांच माहे सप्टेंबर, २०२६ पर्यंतचे वेतन ऑफलाईन पद्धीतने अदा करण्याची कार्यवाही आपल्या स्तरावरुन करण्यात यावी.

 

Related posts:

Leave a Comment