३ पदवीधर व २ शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक-२०२६ मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याबाबत shikshak padvidhar matdarsangha nivadnuk 

३ पदवीधर व २ शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक-२०२६ मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याबाबत shikshak padvidhar matdarsangha nivadnuk 

महोदय / महोदया,

भारत निवडणूक आयोगाच्या दि. २२ सप्टेंबर, २०२६ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकान्वये औरंगाबाद विभाग, पुणे विभाग व नागपूर विभाग या पदवीधर तसेच अमरावती विभाग व पुणे विभाग या शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे.

सदर निवडणुकीचे मतदान दिनांक २३ ऑक्टोबर, २०२६ (शुक्रवार) रोजी सकाळी ८.०० ते सायं. ४.०० पर्यंत व मतमोजणी दिनांक २७ ऑक्टोबर, २०२६ (मंगळवार) रोजी होणार आहे.

या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या पदवीधर/शिक्षक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येण्यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार भर पगारी सुट्टी जाहीर करणे आवश्यक आहे त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २३.०६.२०११ रोजीच्या शासन निर्णयान्वये पदवीधर/शिक्षक निवडणुकीमध्ये मतदार असलेल्या व्यक्तीला विशेष नैमित्तिक रजा जाहीर केलेली आहे, सदरचा शासन निर्णय या कार्यालयाच्या www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदरची रजा ही त्यांच्या अनुज्ञेय असलेल्या नैमित्तिक रजेव्यतिरिक्त असणार आहे.

तसेच सदर निवडणुकीकरीता मतदार असणाऱ्या खाजगी आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या मतदारांना सदर विशेष नैमित्तिक रजा लागू होत नाही. याकरीता, खाजगी आस्थापनेमध्ये काम करणाऱ्या मतदारांना मतदान करण्यासाठी २ तासांची विशेष सवलत देण्याबाबत विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपल्या स्तरावरुन खाजगी आस्थापनांना सूचना देण्यात याव्यात. तसेच याबाबींना व्यापक प्रसिद्धी ही देण्यात यावी ही विनंती.

Related posts:

Leave a Comment