राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० (NEP २०२०) अंतर्गत FLN व पूरक शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी कायमस्वरूपी देणे आणि शाळांमधील अनुपयुक्त /निरूपयोगी साहित्याचे निर्लेखन करण्याबाबत national education program nirlekhan circular 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० (NEP २०२०) अंतर्गत FLN व पूरक शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी कायमस्वरूपी देणे आणि शाळांमधील अनुपयुक्त /निरूपयोगी साहित्याचे निर्लेखन करण्याबाबत national education program nirlekhan circular 

संदर्भ : शासन परिपत्रक क्रमांक दि. १७/०९/२०२६.

उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या संदर्भित परिपत्रकानुसार शाळांमधील शैक्षणिक साहित्याचे निर्लेखन व विद्यार्थ्यांसाठी स्वयंअध्ययन साहित्याच्या वितरणाबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. या परिपत्रकानुसार खालील मुद्द्यांवर आधारित आपल्या स्तरावरून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.

१. साहित्याचे आयुष्यमान व स्वयंअध्ययनासाठी वितरण शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना प्राप्त झालेल्या टिकाऊ शैक्षणिक साहित्याचे आयुष्यमान सर्वसाधारणपणे ३ वर्षांचे राहील. साहित्य प्राप्त झाल्यापासून ३ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याची उपयुक्तता तपासून निर्लेखनाची पात्रता निश्चित करावी. त्यानुसार माहे मार्च २०२३ पूर्वीचे प्राप्त भाषा, गणित, विज्ञान विषयाचे पूरक शैक्षणिक साहित्य निर्लेखित करून त्यामधील वापरण्यायोग्य साहित्य विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी घरी उपलब्ध करून द्यावे. हे साहित्य शैक्षणिक वर्षाच्या शेवटी परत जमा करून न घेता विद्यार्थ्यांकडेच राहील, २. पालकांना मार्गदर्शनः विद्यार्थ्यांनी या साहित्याचा घरी दैनंदिन सराव करावा, यासाठी संबंधित वर्गशिक्षकांनी पालकांना आवश्यक ते मार्गदर्शन करावे.

३. निर्लेखन समिती दि.१६.०४.२०२५ च्या शासन निर्णयानुसार गठीत करण्यात आलेली ‘शाळा व्यवस्थापन समिती (SMC) हीच शाळा स्तरावर ‘निर्लेखन समिती’ म्हणून कामकाज करेल व निरूपयोगी साहित्याचे निर्लेखन करेल.

४. साठा नोंदवहीत (Stock Register) नोंदः निर्लेखित साहित्याची योग्य विल्हेवाट लावून त्याची नोंद साठा नोंदवहीत तात्काळ घेण्यात यावी. निरूपयोगी साहित्य शाळांमध्ये साठवून ठेवू नये.

५. वार्षिक आढावा : वार्षिक आढावा घेवून उचित कार्यवाही करावी. जे साहित्य अद्याप निर्लेखित करण्यात

आलेले नाही, त्याचा दरवर्षी जून महिन्यात आढावा घेण्यात यावा.

तरी आपल्या कुरर्यक्षेत्रातील सर्व शाळांना उपरोक्त शासन परिपत्रकातील तरतुदींनुसार तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात यावेत व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.

Related posts:

Leave a Comment