राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२६-२७ इ. ८ वी साठी परीक्षा दि.२० डिसेंबर २०२६ प्रसिध्दी निवेदनाबाबत nmms exam online application
संदर्भ :-
१) या कार्यालयाचे जा.क्र. मरापप/NMMS/इ.८वी/२०२६-२७/३९१६ दि. ०७/०९/२०२६ रोजीची अधिसूचना.
२) या कार्यालयाचे जा.क्र. मरापप/NMMS/इ.८वी/२०२६-२७/३९१७दि. ०७/०९/२०२६ रोजीचे प्रसिध्दी निवेदन.
३) जा.क्र.मरापप/NMMS/इ.८वी/२०२६-२७/४६२८ दि. ०७/१०/२०२६
४) जा.क्र. मरापप/NMMS/इ.८वी/२०२६-२७/४७५८ दि. १४/१०/२०२६
महोदय,
उपरोक्त संदर्भ क्र. (१) व (२) अन्वये राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२६-२७ या परीक्षेची ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळावर भरण्याच्या वेळापत्रकात तृतीय मुदतवाढ देण्यात येत आहे.
याबाबतचे जाहीर प्रकटनाची प्रत सोबत जोडलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व वर्तमानपत्रे, आकाशवाणी व दूरदर्शनवरुन या परीक्षेच्या जाहीर प्रकटनास विनामूल्य प्रसिध्दी देण्यात यावी अशी विनंती आहे.









