जिल्हा परिषदेतील नामनिर्देशनाने पदभरतीकरीता असलेल्या / सरळसेवेच्या संवर्गाबाबत विवरणपत्रात माहिती उपलब्ध करुन देणेबाबत jillha parishad padbharti circular
महोदय,
मा.सचिव (ग्रा.वि.व पं.रा.वि.) यांचे अध्यक्षतेखाली काल दि.१५.१०.२०२६ रोजी व्ही.सी. संपन्न झाली असूने सदर व्ही.सी. दरम्यान मा. सचिव महोदयांनी दिलेल्या निर्देशांनुसार प्रस्तावित करावयाच्या जिल्हा परिषद गट-क सरळसेवा पदभरतीच्या अनुषंगाने सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त असलेल्या जिल्हा परिषद गट-क सरळसेवा संवर्गाची बिंदुनामावली नोंदवही तात्काळ तपासून अद्ययावत करण्याची कार्यवाही एक महिन्यात पुर्ण करावी.
तसेच, उपरोक्त सोबतच्या विवरणपत्रात नमूद केलेल्या संवर्गाची सरळसेवेच्या कोट्यातील मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांची दि.०१.१०.२०२६ अखेरची अचूक माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या स्वाक्षरीने उपरोक्त नमूद ई-मेल आयडीवर तात्काळ सादर करण्यात यावी, ही विनंती.










