राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथे स्थापन करण्यात आलेले राज्य शाळा मानक प्राधिकरण (State School Authority SSSA) अंतर्गत उसनवारी ने पदे भरण्याबाबत
संदर्भ: १. शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण २०२४/प्र.क्र.०९/एसडी-६ दि. १५ मार्च २०२४
NEP २०२० मधील परि. ८.१ मध्ये नमूद केलेनुसार शैक्षणिक निष्पत्तीमध्ये सातत्याने सुधारणा करणे हे शालेय शिक्षण नियामक व्यवस्थेचे उद्दिष्ट आहे. याकरिता आवश्यक गुणवत्तेच्या मानकांचे अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी, शिक्षणाच्या सर्व स्तरांसाठी व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शासकीय, खाजगी अनुदानित व स्वयं अर्थ सहाय्यीत शाळांसाठी एक प्रभावी गुणवत्ता स्वयं-नियमन किंवा अधिस्वीकृती प्रणाली स्थापन करण्यासाठी व सर्व शाळा काही किमान व्यावसायिक आणि गुणवत्तेच्या मानकांचे पालन करतील हे सुनिश्चित करण्यासाठी, राज्यात राज्य शाळा मानक प्राधिकरण (SSSA) ही एक स्वतंत्र, राज्य-व्यापी संस्था स्थापन करतील. यासंदर्भात संदर्भ क्र. १ नुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे येथे राज्य शाळा मानक प्राधिकरण (State School Standards Authority – SSSA) स्थापन करणेसंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. त्याअंतर्गत SSSA मूलभूत निकषांच्या आधारे किमान मानकांचा संच (म्हणजेच, सुरक्षा, सुरक्षितता, मूलभूत पायाभूत सुविधा, विषयांसाठी आणि इयत्तांमधील शिक्षकांची संख्या, आर्थिक विश्वसनीयता आणि प्रशासनाच्या उत्तम प्रक्रिया) निर्माण करण्यात आला.
करिता उपरोक्त शासन निर्णयानुसार राज्य शाळा मानक प्राधिकरणात कामकाजासाठी जी पदे निश्चित करण्यात आली आहेत त्यांच्या नियुक्त्या या प्राधान्याने उसनवारी ने कराव्यात व बाह्य कंत्राटी पद्धतीने नेमावयाचे असल्यास वित्त विभागाची परवानगी घेऊन नियुक्ती करावी असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. यास अनुसरून राज्य शाळा मानक प्राधिकरण (State School Standards Authority – SSSA) मधील पदे ही उसनवारीने भरण्यात येत आहेत.
कार्यक्रम व्यवस्थापक
१. राज्यातील सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यमाच्या शाळांसाठी स्वयंमूल्यांकन आणि बाह्यमूल्यांकनासाठी कृती
कार्यक्रम आयोजित करणे.
२. स्वयं मूल्यांकनानुसार शाळांची श्रेणीनिहाय वर्गवारी करून शाळांसाठी विकास आराखडा तयार करणे.
३. शाळा विकास आराखड्यानुसार गुणवत्ता विकासासाठी सुधारणेचा क्षेत्रनिहाय आराखडा / कृती कार्यक्रम
तयार करणे,
४. शाळांचे बाह्यमूल्यांकन नियोजन करणे.
५. कार्यक्रमासाठी आवश्यक विविध विभागांशी समन्वय करणे.
६. शाळा मूल्यांकन निर्धारकाच्या निवडीची प्रक्रिया निश्चित करणे.
७. जिल्हा संपर्क अधिकारी, बाह्य मूल्यांकन निर्धारक, शाळा प्रमुख यांच्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करणे.
८. स्वयं मूल्यांकन व बाह्य मूल्यांकन अनुषंगिक सर्व कामकाज करणे.
९. विभाग प्रमुख यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
१०. या विषयाच्या अनुषंगाने केंद्र, राज्य व SCERT स्तरावरून वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करणे.
११. वेळोवेळी त्रैमासिक अहवाल प्रसिद्ध करणे.
२. कार्यक्रम सहायक/माहिती विश्लेषक
१. स्वयंमूल्यांकनाद्वारे प्राप्त माहितीचे शालेय गुणवत्ता मूल्यांकन आणि अधिस्वीकृती आराखड्यानुसार
विश्लेषण करणे.
२. शालेय गुणवत्ता विकासाचे प्राधान्यक्रमाने क्षेत्र ठरविणे.
३. बाह्य मूल्यांकन प्राप्त माहितीचे शालेय गुणवत्ता मूल्यांकन आणि अधिस्वीकृती आराखड्यानुसार विश्लेषण करणे.
४. आवश्यकतेनुसार राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावर संपर्क करणे.
५. बाह्य मूल्यांकनानंतर क्षेत्रानुसार, उपक्षेत्रानुसार, मानकानुसार अहवाल तयार करणे.
६. बाह्य मूल्यांकनाचे अहवाल जिल्ह्यांना अवगत करणे.
७. आवश्यक त्यावेळी मीटिंगमध्ये किंवा प्रशिक्षण तथा कार्यशाळेमध्ये अहवालाचे सादरीकरण करणे.
८. माहिती विश्लेषण संबंधित सर्व अनुषंगिक कामकाज करणे.
९. विभाग प्रमुख यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
१०. या विषयाच्या अनुषंगाने केंद्र, राज्य व SCERT स्तरावरून वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करणे.
३. तांत्रिक सहायक
१. वेबसाईट / वेब पोर्टल विकसन व देखभाल दुरुस्तीसाठी शालेय शिक्षण विभागाच्या E-Governance Cell
चे सहाय्य घेणे व राज्य शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि अधिस्वीकृती करण्यासाठी वेब पोर्टलची निर्मिती करणे.
२. वेबपोर्टल वरील शाळा नोंदणी, स्वय मूल्यांकन, बाह्य मूल्यांकन, विविध अहवाल, सांख्यिकी माहिती संबंधी सर्व प्रकारचे कामकाज करणे.
३. वेब पोर्टल, data संबंधीचे आणि संगणकीय माहिती संबंधीचे सर्व कामकाज करणे.
४. विभाग प्रमुख यांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.
५. या विषयाच्या अनुषंगाने केंद्र, राज्य व SCERT स्तरावरून वेळोवेळी दिलेल्या सूचनांनुसार कार्यवाही करणे.
राज्य मानक प्राधिकरण (SSSA) कक्षातील कर्मचारी यांची निवड व नियुक्तीसाठी अटी व शर्ती :
उसनवारी द्वारे निवड करण्यात येणाऱ्या उमेदवारास पुढील अटी व शर्ती बंधनकारक राहतील.
१. उसनवारी स्वरूपातून नियुक्त करावयाच्या पदांसाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील शिक्षक / शालेय शिक्षण विभागातील अधिकारी यांचेमधून मुलाखत अथवा अन्य निवड प्रक्रिया राबवून उमेदवारांची निवड करण्यात येईल.
२. विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या आवेदन पत्रांची छाननी करुन, उमेदवारांना पात्रता पडताळणी व मुलाखतीचे नियोजन कळविणेत येईल.
३. उसनवारीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील (जि.प./ न.प./ म.न.पा.) प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक, माध्यमिक शिक्षक तसेच केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी (शिक्षण), गटशिक्षणाधिकारी / उपशिक्षणाधिकारी / अधिव्याख्याता / जेष्ठ अधिव्याख्याता, शिक्षणाधिकारी यांना उमेदवारी अर्ज दाखल करता येईल.
४. उसनवारीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारास जिल्हास्तरावर, विभागस्तरावर व राज्यस्तरावर विविध स्वरुपाचे काम करण्याचा अनुभव असावा.
५. उमेदवारास संगणक ज्ञान असणे, मराठी व इंग्रजी टायपिंग करता येणे आवश्यक आहे.
६. उसनवारी कालावधीमध्ये कोणताही विशेष भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
७. उसनवारी कालावधीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे वेतन व भत्ते मूळ आस्थापनेवरुन काढण्यात येतील.
८. पदावर उसनवारीसाठी निवड झाल्यास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी दिलेल्या कर्तव्ये व जबाबदाऱ्या पूर्ण करणे बंधनकारक राहील.
९. उसनवारी कालावधीमध्ये संबंधितांचे काम समाधानकारक नसल्यास अथवा संस्थेच्या प्रतिमेस /हितास बाधा पोहोचेल असे गैरवर्तन केलेले निदर्शनास आल्यास त्यांची उसनवारी तात्काळ रद्द करून मूळ आस्थापनेवर रुजू व्हावे लागेल. तसेच अशा प्रसंगी प्रकरणपरत्वे आवश्यकतेनुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.
१०. उसनवारी ने निवड झालेल्या उमेदवारास महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम १९८९ मधील
तरतूदीनुसार देय ठरणाऱ्या नैमत्तिक, अर्जित व वैद्यकीय रजा अनुज्ञेय राहतील. उसनवारी
कालावधीत शिक्षकांना दीर्घ मुदत सुट्टी लागू असणार नाही.
Image
Text
SCERT-51.0/51/2026-55SA
1/2203387/2026
११. उसनवारी ने पदावर निवड झाल्यानंतर रुजू होताना मूळ आस्थापनेकडील कार्यमुक्ती प्रमाणपत्र देणे बंधनकारक राहील.
१२. उमेदवारांची निवड झाल्यावर त्यांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच अंतिम निवड आदेश देण्यात येतील.
१३. सदर पदांसाठी अर्ज भरतेवेळी वरिष्ठ कार्यालयाची परवानगी नसली तरी अर्ज भरावेत. निवड झाल्यानंतर आपण सादर केले तरी चालेल अथवा काही अडचण निर्माण झाल्यास शासन स्तरावरून याबाबत कार्यवाही करण्यात येईल.
टीप: उपरोक्त पदाच्या निवड प्रक्रियेबाबत अथवा अटी, शर्ती संदर्भात बदल करणेबाबत निर्णय घेण्याचे अंतिम अधिकार हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांना असतील.
वरील प्रमाणे पदे ही शिक्षण विभागातील अनुभवी अधिकारी, शिक्षक / मुख्याध्यापक यांच्यामधून योग्य निवड पद्धतीद्वारे उसनवारी तत्वावर भरण्यात येतील.
सदर पदे भरण्याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे लिंकच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांचे आवेदन पत्रे मागविण्यात येत आहेत.
तसेच सदर लिंक मधून प्राप्त उमेदवारांच्या संख्येनुसार त्यांची लेखी स्वरूपात निवड चाचणी घेण्यात येईल व त्यानंतर एकास तीन या प्रमाणात उमेदवार निश्चित करून त्यांची मुलाखत प्रक्रिया राबवण्यात येईल. याकरिता मुलाखत समिती निश्चित करणे व त्याचा कालावधी याबाबत परिषद स्तरावरून सूचना प्रसिद्ध करण्यात येतील.
दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ अखेर पत्रासोबत दिलेल्या
https://docs.google.com/forms/d/e/FAIpQLSfFJYpYsxmMIDDH-x-
QLYHbcoYAuUCsPoj-z३CU७G९०eNahbA/viewform?usp=publish-editor लिंकमध्ये इच्छुक उमेदवारांनी आपली माहिती नोंदवावी.
करीता उपरोक्त प्रमाणे वरील सर्व सूचना आपले स्तरावरून सर्व शाळांना कळविण्याची दक्षता
घेण्यात यावी.
(मा. संचालक यांच्या मान्यतेने)










