बालसंगोपन योजनेच्या DBT करीता वापरण्यात येणाऱ्या पोर्टलच्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना balsangopan yojana dbt circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बालसंगोपन योजनेच्या DBT करीता वापरण्यात येणाऱ्या पोर्टलच्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना balsangopan yojana dbt circular 

महोदया,

महासारथी नागरिक पोर्टल ची माहिती पुस्तिका व क्रांतीज्योती बालसंगोपन योजनेच्या पोर्टलसंदर्भातील माहिती पुस्तिका सोबत जोडली आहे.

२. बालसंगोपन योजना Governance Process Re-engineering (GPR) अंतर्गत घेण्यात आली असून सदर योजनेकरीता माहिती व तंत्रज्ञान विभागामार्फत पोर्टल तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे. माहिती य तंत्रज्ञान विभागामार्फत स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत Centralized DBT प्रणाली राबविली जात आहे. त्यामुळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आयुक्तालय स्तरावरुन देण्यात येणारा लाभ शासनस्तरावरुन थेट लाभार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

३. महाआयटी मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेकरीता करावयाच्या अर्जाबाबत महाआयटीने महासारथी नागरीक पोर्टल तयार केले आहे. सदर पोर्टलला भेट देऊन शासकीय सेवा मिळविण्याकरीता कोणती पध्दत वापरावी याबाबत महाआयटीने माहिती पुस्तिका उपलब्ध करुन दिलेली आहे. सदर माहिती पुस्तिका सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये ठेवून बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्याकरीता आलेल्या नागरीकांना अर्ज कसा करावा याबाबत मार्गदर्शन करुन सदर अर्ज करण्याकरीता सहकार्य करण्याबाबत आपल्यामार्फत सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना सुचना देण्यात याव्यात.

४. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेकरीता प्राप्त झालेल्या अर्जावर कशाप्रकारे कार्यवाही करायी याबाबत महाआयटीने बालसंगोपन योजनेच्या पोर्टलबाबतची माहिती पुस्तिका उपलब्ध करुन दिलेली आहे. सदर माहितीपुस्तिकेमध्ये बालसंगोपन योजनेचा अर्ज पोर्टलवर प्राप्त झाल्यावर कोणत्या प्रकारे कार्यवाही करावी याबायत माहिती उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यानुसार संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे. वालसंगोपन योजनेचे पोर्टल लॉगिन करण्याकरीता सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व बाल कल्याण समिती यांना युझर आयडी व पासवर्ड उपलब्ध करुन दिलेला असून त्यानुसार सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व बाल कल्याण समिती यांनी कार्यवाही करावी, तसेच सदर पोर्टल लवकरच सुरु होणार असल्याने पोर्टल सुरु झाल्यानंतर सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व बाल कल्याण समिती यांना उपलब्ध करुन दिलेले लॉगिन आयडी व पासवर्ड टाकून आपले खाते कार्यन्चित आहे किंवा याबाबत खातरजमा करावी. पोर्टल सुरु करण्यास काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास तात्काळ शासनास संपर्क साधावा अशा सुचना आपल्या स्तरावरुन सर्व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांना देण्यात याव्यात, ही विनंती

Related posts:

Leave a Comment