सन 2026 च्या खरीप हंगामातील दुष्काळसदृश घोषित तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काचा परतावा मिळण्याबाबत आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवणेबाबत students pariksha fee partava circular

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन 2026 च्या खरीप हंगामातील दुष्काळसदृश घोषित तालुक्यांतील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काचा परतावा मिळण्याबाबत आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवणेबाबत students pariksha fee partava circular 

संदर्भ : विद्यापीठाचे पत्र जावक क्र. परीक्षा/पनिका/2026/2132, दि. 16/10/2026.

महोदय,

उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये विद्यापीठामार्फत सन 2026 च्या खरीप हंगामात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित केलेल्या तालुक्यांतील परीक्षा शुल्क माफीच्या सवलतीस पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काचा परतावा देण्याबाबत कळविण्यात आलेले आहे. सदर परीक्षा शुल्काचा परतावा पात्र विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने जमा करण्यात येणार आहे.

तरी, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी विद्यापीठामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या ऑनलाईन सुविधेद्वारे खालील कागदपत्रे व माहिती ऑनलाईन पध्दतीने सादर/Upload करण्यासाठी तयार ठेवावी.

1) विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या वेळी नोंदविलेला ईमेल आयडी व मोबाईल नंबर चा उपयोग या प्रक्रियेकरीता करण्यात येणार आहे.

2) विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्काची पावती.

3) उत्पन्नाचा दाखला.

4) रहिवासी दाखला.

5) बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत / Cancelled Cheque (खातेदाराचे नाव, खाते क्रमांक व IFSC कोड स्पष्ट दिसेल अशी).

6) आधार कार्डची प्रत

7) पॅनकार्ड

सदर अर्ज भरण्याची ऑनलाईन सुविधा, अर्ज सादर करण्याची प्रक्रिया व अंतिम मुदत याबाबतची सविस्तर माहिती विद्यापीठामार्फत स्वतंत्रपणे कळविण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांचे नियमित अवलोकन करावे. याची सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

Related posts:

Leave a Comment