महसूल सेवक (कोतवाल) पदभरती सन २०२६ बाबत mahsul sevak padbharti circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महसूल सेवक (कोतवाल) पदभरती सन २०२६ बाबत mahsul sevak padbharti circular 

संदर्भ :-

(१) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. केओटी-२०१२/प्र.क्र.१७/ई-१०, दि.०५, सप्टेंबर, २०१३.

(२) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१७/ई-१०, दि. १७ मे, २०२३.

(३) शासनाचे सम क्रमांकाचे पत्र दि.१९.०८.२०२६, दि.०३.०९.२०२६, दि.१.१०.२०२६

(४) शासन निर्णय, सा.प्र.वि. क्र. एसआरव्ही-२०२६/प्र.क्र.६४/सेवा-१ (का.

१२), दि. ५.११.२०२६

महोदय,

उपरोक्त विषयांकित प्रकरणी राज्यातील दि.३१.०५.२०२६ रोजी रिक्त असलेल्या २९१२ इतक्या महसूल सेवकांची रिक्त पदे भरण्यासाठी “एक विशेष बाब” म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. तसेच महसूल विभागामार्फत शासनपत्र दिनांक ३.९.२०२६ अन्वये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये रिक्त असलेली २९१२ इतकी महसूल सेवकांची रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली असून शासन पत्र दिनांक १.१०.२०२६ अन्वये जिल्ह्यांमधील दिनांक ३१.८.२०२६ अखेर रिक्त असलेल्या पदांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

२. सदर पद भरतीकरिता वेळापत्रक आखून देण्यात आलेले असून त्यानुसार, दिनांक २८.११.२०२६ अखेर पदभरती पूर्ण करून गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. तथापि, विधानपरिषदेच्या पदवीधर मतदारसंघ व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर व पुणे विभागातील महसूल सेवकांची पदभरती स्थगित करण्यात आलेली आहे. मात्र नाशिक व कोकण विभागातील महसूल सेवक पदभरती दिलेल्या वेळापत्रकानुसार पार पाडण्याची कार्यवाही सुरू असून या करिता परीक्षा दि.१५.११.२०२६ रोजी नियोजित करण्यात आल्या आहेत.

३. तथापि, सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक ५.११.२०२६ च्या उक्त शासन निर्णयामध्ये नमूद केलेली शिथिलता ही शासन सेवेतील गट-अ ते गट-ड मधील पदभरती प्रक्रियेसंदर्भात देण्यात आलेली असून सदरची शिथिलता ही महसूल सेवक पदाकरिता लागू आहे किंवा कसे याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे अभिप्राय घेण्यात येत आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे अभिप्राय प्राप्त होताच दि.१५.११.२०२६ रोजीच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासननिर्णयानुसार महसूल सेवक पदाकरिता लागू करावयाच्या वयोमर्यादेच्या शिथीलते बाबतचा निर्णय आपणास कळविण्याची दक्षता घेण्यात येत आहे.

४. उपरोक्त वस्तुस्थिती विचारात घेता दिनांक १५.११.२०२६ रोजी नियोजित नाशिक व कोकण विभागातील उक्त पदाच्या परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात येत असून नाशिक व कोकण विभागातील जिल्हाधिकारी यांनी याबाबत प्रसिध्दी देऊन सदरची बाब सर्व परिक्षार्थीच्या निदर्शनास आणून देण्यात यावी.

५. शिक्षक व पदवीधर मतदार संघातील निवडणुकांमुळे नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजी नगर व पुणे या महसुली विभागातील स्थगित परीक्षा व नाशिक व कोकण विभागातील पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा घेण्याकरिता या शासन पत्रान्वये खालीलप्रमाणे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात येत असून सुधारित केलेल्या वेळापत्रकातील कालावधीनुसार पदभरती प्रक्रिया राबविण्यात यावी. (दि. ३१.८.२०२६ च्या स्थितीस अनुसरून)

शासन परिपत्रक pdf download 

Related posts:

Leave a Comment