शैक्षणिक वर्ष २०२७ मध्ये २१ सीईटी परीक्षा; ११ अभ्यासक्रमांसाठी दोन संधी education year cet exam 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शैक्षणिक वर्ष २०२७ मध्ये २१ सीईटी परीक्षा; ११ अभ्यासक्रमांसाठी दोन संधी education year cet exam 

पीजीडीएम, पीजीसीएम आणि जीएनएम नर्सिंगची प्रथमच सीईटी ; पीसीएमची पहिली परीक्षा १६ ते २६ एप्रिलदरम्यान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२७-२८ साठी पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा एकूण २१ सीईटी परीक्षा घेण्यात येणार असून, त्यापैकी ११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, यंदापासून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट (PGDM), पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट इन मॅनेजमेंट (PGCM) आणि जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी (GNM) या तीन अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रथमच घेतल्या जाणार आहेत. जानेवारी महिन्यात परीक्षा सुरू होऊन १० जून २०२७ पर्यंत विविध सीईटी परीक्षा पार पडणार आहेत.

२०२६ मध्ये घेण्यात आलेल्या २० सीईटी परीक्षांसाठी १८ लाख १४ हजार ४५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर १६ लाख ३१ हजार ३३५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने यंदा दोन वेळा सीईटी घेण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांची संख्या तीनवरून ११ करण्यात आली आहे.

११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा

राष्ट्रीय स्तरावर जेईई मेनच्या दोन परीक्षा घेतल्या जात असल्याने विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळतात. याच धर्तीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही दोन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मागील वर्षापासून पीसीएम, पीसीबी आणि एमबीए /एमएमएस या तीन अभ्यासक्रमांच्या सीईटी दोन वेळा घेण्यात येत आहेत. या प्रयोगाला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन यंदा आणखी आठ अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार पीसीएम, पीसीबी, एमबीए/एमएमएस, पीजीडीएम, पीजीसीएम, पाच वर्षीय

एलएलबी, बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम अशा एकूण ११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा सीईटी घेतली जाणार आहे.

विद्यार्थ्यांना पहिली सीईटी देणे बंधनकारक असून दुसरी सीईटी ऐच्छिक राहणार आहे. दोन्ही परीक्षा दिल्यास प्रवेशासाठी विद्यार्थ्याच्या ज्या परीक्षेत अधिक पसेंटाइल गुण असतील, तेच गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.

पीजीडीएम, पीजीसीएम आणि जीएनएमची प्रथमच सीईटी

शासनाच्या निर्देशानुसार यंदा पीजीडीएम, पीजीसीएम आणि जीएनएम नर्सिंग या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रथमच सीईटी घेण्यात येणार आहे. यामध्ये पीजीडीएम आणि पीजीसीएम या अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा परीक्षा होणार आहेत. पीजीडीएम व पीजीसीएम यांची सीईटी एमबीए सीईटी बरोबरच घेतली जाणार आहे.

दरम्यान, तीन वर्षीय एकात्मिक बीएड-एमएड अभ्यासक्रमाची सीईटी यंदा घेतली जाणार नाही. राज्यात हा अभ्यासक्रम एकाच संस्थेत सुरू असून, एकूण ५५ जागांपैकी यंदा केवळ १२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर एमपीएड व एमएड व बीएड या परीक्षा जूनमध्ये घेण्यात याव्यात अशी विद्यार्थी व संस्था यांची मागणी होती. त्यामुळे या परीक्षा यावर्षी जून मध्ये घेण्यात येत आहेत.

सीईटी कक्षाने जाहीर केलेले हे वेळापत्रक संभाव्य असून, विद्यार्थ्यांनी अधिकृत वेळापत्रक व पुढील सूचनांसाठी सीईटी कक्षाच्या https://cetcell.mahacet.org/ संकेतस्थळाला भेट द्यावी.

२०२७ च्या सीईटी परीक्षेच्या दोन संधीच्या संभाव्य तारखा Click here 

शासन परिपत्रक pdf download 

Related posts:

Leave a Comment