सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्याकंन चाचणी अतंर्गत संकलित मुल्यमापन चाचणी -१ (pat-२) च्या आयोजनाबाबत pat exam circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात नियतकालिक मूल्याकंन चाचणी अतंर्गत संकलित मुल्यमापन चाचणी -१ (pat-२) च्या आयोजनाबाबत pat exam circular

संदर्भ-

१. या आयुक्तालयाचे पत्र दि.०२.११.२०२६

२. सहसंचालक राज्य शैक्षणिक संस्था व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र दि.०२.११.२०२६

३. अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना यांचे पत्र दि.०५.११.२०२६

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, मूल्यमापन चाचणीच्या दरम्यान जागतिक दिव्यांग दिन सोहळा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजित केला आहे. जागतिक दिव्यांग दिन ३ डिसेंबर २०२६ या दिवसाचे अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक ०२ ते ०५.१२.२०२६ दरम्यान दिव्यांगांसाठी विविध कार्यक्रम रॅली, मैदानी खेळ, विविध संस्कृतीक व जन जागृती कार्यक्रम आयोजित केले जातात. सदर कार्यक्रमाला शासकीय अधिकारी, विशेष शिक्षक, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच स्वयंमसेवी संस्था व विविध मान्यवर तसेच दिव्यांग विद्यार्थी यांची उपस्थिती असते.

त्या अनुषंगाने दिनांक ०२,०३ व ०५ डिसेंबर २०२६या कालावधीत आयोजित केलेली परीक्षा ३ डिसेंबर नंतर घेण्यात याव्यात व तसे आपल्या क्षेत्रीय कार्यालयास कळविण्यात यावे.

सोबत – संदर्भ क्र.०१ व ०३ चे पत्र

Related posts:

Leave a Comment