सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेची विस्तृत कार्यपध्दती निश्चित करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीस मुदतवाढ देण्याबाबत sudharit nivruttivetan yojana circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेची विस्तृत कार्यपध्दती निश्चित करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीस मुदतवाढ देण्याबाबत sudharit nivruttivetan yojana circular 

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग,

शासन निर्णय क्रमांक : रानियो-२०२६/प्र.क्र.४३/सेवा-४, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२.

दिनांक : १७.११.२०२६.

वाचा : शासन निर्णय समक्रमांक दि.१०.०७.२०२६.

प्रस्तावना :

सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेले निवृत्तिवेतन अदा करण्याबाबतची सविस्तर कार्यपध्दती निश्चित करण्यासाठी संदर्भाधीन शासन निर्णयान्वये समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीने प्राथमिक अभ्यास करुन ज्या बाबींमध्ये धोरणात्मक निर्णय अपेक्षित आहे. अशा बाबी शासनाच्या मार्गदर्शनार्थ सादर केल्या आहेत. त्यानुषंगाने समितीची कार्यकक्षा वाढविणे तसेच समितीस मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

सदर समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे वाढविण्यात येत आहे –

अ) सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेंतर्गत सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांचे निवृत्तिवेतन निश्चित करणेबाबत तसेच सदर निवृत्तिवेतन अदा करण्याबाबतची सविस्तर कार्यपध्दती निश्चित करणे.

करणे. आ) उपरोक्त संदर्भातील शासन निर्णयाचे प्रारुपासह शासनास सविस्तर अहवाल सादर

२. सदर समितीस उपरोक्त कार्यवाही करण्यासाठी चार महिन्यांची म्हणजेच दि.१०.०१.२०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६१११७११२४४७९८०५ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Related posts:

Leave a Comment