SIR मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण-2026 सुधारीत वेळापत्रक sir sudharit timetable circular
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय
क्रमांकः ईएलआर २०२६/प्रक्र ७०/भाग१/निवडणूक-६ सामान्य प्रशासन विभाग, मादाम कामा रोड, राजगुरु हुतात्मा चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक: १८ नोव्हेंबर, २०२६.
प्रति,
१) आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर / मुंबई उपनगर.
२) सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई तथा मतदार यादी निरीक्षक (मुंबई शहर व मुंबई उपनगर).
३) सर्व विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक.
४) सर्व अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर/ मुंबई उपनगर.
५) सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून).
विषय : मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरिक्षण- २०२६ सुधारित वेळापत्रक.
संदर्भ: भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र. २३/२०२५- ईआरएस (Vol.II), दिनांक १४.०५.२०२६, २९.१०.२०२६ व १७.११.२०२६.
महोदय,
उपरोक्त विषयाबाबत भारत निवडणूक आयोगाच्या संदर्भाधीन दिनांक १७.११.२०२६ च्या पत्राची प्रत सोबत जोडली आहे.
२. भारत निवडणूक आयोगाच्या सदर पत्रान्वये अनुपस्थित / स्थलांतरीत / मृत / दुबार (ASDD) मतदारांकरीता गणना प्रपत्र (Enumeration Form) उपलब्ध करुन देण्यात आले असून, सदर गणना प्रपत्रावर करावयाच्या कार्यवाहीकरीता खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे :-
कार्यवाही करावी.

३. वरीलप्रमाणे गणना प्रपत्र (Enumeration Form) बाबतची कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने, महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे सुधारीत करण्यात आले आहे :

४. भारत निवडणूक आयोगाकडून अनुपस्थित / स्थलांतरीत / मृत / दुबार (ASDD) मतदारांकरीता गणना प्रपत्र (Enumeration Form) ECINET वर उपलब्ध करुन देण्यात आले असून, मतदार नोंदणी अधिकारी (ERO) उपलब्ध करुन दिलेले गणना प्रपत्र डाऊनलोड करुन गणना प्रपत्राची एक प्रत छपाई करुन घेण्यात यावी. गणना प्रपत्राच्या मागील बाजूस “परिशिष्ट-ब” व “परिशिष्ट-क” ची छपाई करण्यात यावी. तसेच, गणना प्रपत्राबाबतच्या सूचना वेगळ्याने छपाई करुन घेण्यात याव्यात व मतदारांना गणना प्रपत्रासह वितरीत करण्यात याव्यात. गणना प्रपत्र मतदारांना दिल्याची पोच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी स्वतंत्ररित्या नोंदवहीमध्ये ठेवावी. तसेच, मोबाईल फोनवर व्हॉटसअॅपची सुविधा असलेल्या मतदाराला संपूर्ण भरलेल्या गणना प्रपत्राची प्रत व्हॉटसअॅपद्वारे उपलब्ध करुन द्यावी व अशी सुविधा उपलब्ध नसल्यास याबाबतची पोच स्वतंत्ररित्या अर्जदारास देण्यात यावी.
गणना प्रपत्र भरुन घेण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळापत्रकानुसार आवश्यक ती पुढील कार्यवाही करावी. तसेच, सुधारीत वेळापत्रकाबाबत स्थानिक पातळीवर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना अवगत करण्यात यावे व प्रसिध्दी माध्यमांद्वारे व्यापक प्रसिध्दी देण्यात यावी, ही विनंती.










