बालचित्रकला स्पर्धा-२०२६ आयोजनाकरीता मार्गदर्शक सूचना balchitrakala spardha guidelines
शालेय विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाकडून दरवर्षी आयोजित करण्यात येणारी बालचित्रकला स्पर्धा या वर्षी दि.८ ऑगस्ट, २०२६ रोजी खालील चार गटामध्ये सर्व केंद्र-शाळेवर संपूर्ण राज्यात एकाच दिवशी आयोजित करावयाची आहे.
सदर स्पर्धेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी सविस्तर वेळापत्रक खालील तक्यात दर्शविण्यात आले आहे. बालचित्रकला स्पर्धेकरिता शाळेची नोंदणी व विद्यार्थ्यांची नोंदणी https://www.msbae.ac.in या संकेतस्थळावरील बालचित्रकला या टॅबमध्ये किंवा https://balchitrakala2026.msbae.in या लिंकवर भरावयाचा आहे.
बालचित्रकला स्पर्धा-२०२६ चे आयोजनाकरीता सविस्तर महत्वाचे वेळापत्रक:-
स्पर्धा आयोजनाबाबत महत्त्वाचे नियम
१. प्रवेश शुल्क : बालचित्रकला स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क रु.२०/- (रुपये वीस फक्त) इतके आहे.
२. मंडळाकडे ऑनलाईन भरावयाचे शुल्क विद्यार्थ्यांची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने करताना प्रति विद्यार्थी रु.२०/- या रक्कमेमधून ड्रॉईंग कागदाचा (११ इंच X १५ इंच या आकाराचा) खर्च रु.५/- वजा करुन उर्वरीत रक्कम रु.१५/- प्रति विद्यार्थी मंडळाकडे दिनांक ३१.०७.२०२६ पर्यंत ऑनलाईन जमा करावयाची आहे.
३. प्रवेशपत्र व याद्याः बालचित्रकला स्पर्धेचे प्रवेशपत्र आणि गटनिहाय याद्या दिनांक ०४ ऑगस्ट, २०२६ रोजी सर्व केंद्र/शाळांच्या लॉग-इनवर उपलब्ध होतील. याची गोपनियता राखण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित केंद्र/शाळेचे मुख्याध्यापक यांची आहे.
४. प्रश्नपत्रिका वितरणः स्पर्धेच्या गटनिहाय प्रश्नपत्रिका संबंधित केंद्र/शाळांना ऑनलाईन (प्रत्येक केंद्राकरिता एक) उपलब्ध करून दिल्या जातील. त्यानंतर संबंधित वर्गातील पर्यवेक्षकाने गटनिहाय प्रश्नपत्रिकेचा विषय परीक्षेच्या वेळी फळ्यावर (Black Board) लिहून देणे बंधनकारक आहे.
५. ड्रॉईंग पेपरः स्पर्धकांना ११ इंच X १५ इंच आकाराचा कागद (ड्रॉईंग पेपर) संबंधित केंद्र/शाळांनी पुरवणे आवश्यक असून त्यावर विद्यार्थ्यांची माहिती खालीलप्रमाणे नमुद करण्याकरीता शिक्का मारावा.
वरील संपूर्ण माहिती अचूक भरण्याकरीता विद्यार्थ्यांना पर्यवेक्षक / समवेक्षक यांनी सहाय्य करावे. माहिती बरोबर असल्याची खात्री करुनच दिनांक व स्वाक्षरी करुन उत्तरपत्रिका पुढील कार्यवाहीसाठी सादर कराव्यात.
६. वेळ व साहित्यः स्पर्धकांनी स्वतःचे रंग (क्रेयॉन, जलरंग, पोस्टर कलर), ब्रश व इतर चित्रकला साहित्याच्या सहाय्याने दोन तासांत चित्र पूर्ण करणे आवश्यक आहे.
७. चित्र सुपूर्द करणेः स्पर्धा पार पडल्यानंतर चित्रांची गटनिहाय वर्गवारी करून दिनांक १२.०८.२०२६ पर्यंत संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे सोपवणे बंधनकारक राहील.
तालुकास्तरीय निवड समिती :-
केंद्र/शाळा यांच्याकडून प्राप्त झालेल्या चित्रकामांमधून प्रत्येक गटातील २० याप्रमाणे एकूण ८० चित्रकामे निवडण्यासाठी संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून खालीलप्रमाणे तालुकास्तरीय निवड समिती गठित करुन सदर आदेश दि.१२.०८.२०२६ पर्यंत निर्गमित करावी.
गटशिक्षणाधिकारी यांचेकरिता आवश्यक कार्यपद्धतीः
१. गटशिक्षणाधिकारी संबंधित पोर्टलवर https://www.msbae.ac.in या संकेतस्थळावर किंवा https://balchitrakala2026.msbae.in या लिंकवर Block Education Officer या टॅबवर लॉग-इन करुन युजर आयडी व पासवर्ड तयार करतील.
२. लॉगिनमध्ये त्यांच्या तालुक्यातील सर्व केंद्रांची गटनिहाय विद्यार्थी संख्या प्राप्त होईल.
३. गटशिक्षणाधिकारी त्यांच्या तालुक्यामधील सर्व केंद्र/शाळांवर नियंत्रण ठेवतील.
४. स्पर्धेनंतर त्यांच्या कार्य कक्षेत असलेल्या सर्व केंद्र/शाळांवर होणाऱ्या स्पर्धेचे गटनिहाय सर्व उत्तरपत्रिका (पेपर) संकलन करतील.
५. संकलन करण्यात आलेल्या ड्रॉईंग पेपरचे वरील समितीमार्फत गटनिहाय वर्गवारी करतील.
६. वर्गवारी केल्यानंतर वरील समितीमार्फत प्रत्येक गटामधील २० चित्रे (२० x ४ गट = एकूण ८० चित्रे) निवड करतील.
७. तालूका स्तरावर निवड करण्यात आलेल्या चित्रांची माहिती (विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव, पालकाचे संपूर्ण नाव, गट, इयत्ता, जन्मतारीख, शाळेचे नाव) इत्यादी माहिती गटशिक्षणाधिकारी त्यांच्या लॉगिनवर भरतील.
८. सर्व माहिती संकलित करून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना ऑनलाईन पद्धतीने सादर करतील.
९. तालुका स्तरावर निवड करण्यात आलेल्या प्रत्येक गटामधील २० चित्रे (२० x ४ गट = एकूण ८० चित्रे) संबधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना दि.२५.०८.२०२६ पर्यंत सादर करतील.
महानगरपालिका क्षेत्रासाठी सुचना :-
१) स्पर्धा पार पडल्यानंतर महानगरपालीका क्षेत्रातील (बृहन्मुंबई वगळता) सर्व शाळांनी चित्रांची गटनिहाय वर्गवारी करून चित्रकामे महानगरपालीकेच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडे दिनांक १२.०८.२०२६ पर्यंत जमा करावी.
२) महानगरपालीकेच्या शिक्षणाधिकारी यांनी तालुकास्तरावर निवड समितीप्रमाणे कार्यवाही करुन निवड करण्यात आलेल्या प्रत्येक गटामधील २० चित्रे (२० x ४ गट एकूण ८० चित्रे) संबधित जिल्हयातील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना दि.२५.०८.२०२६ पर्यंत सादर करावीत.
३) बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व शाळांनी चित्रांची गटनिहाय वर्गवारी करून चित्रकामे शिक्षण निरीक्षक, दक्षिण/पश्चिम/उत्तर (बृहन्मुंबई) यांच्याकडे दिनांक १२.०८.२०२६ पर्यंत जमा करावी.
४) शिक्षण निरीक्षक, दक्षिण/पश्चिम/उत्तर (बृहन्मुंबई) यांनी तालुकास्तरावर निवड समितीप्रमाणे कार्यवाही करुन निवड करण्यात आलेल्या प्रत्येक गटामधील २० चित्रे (२० x ४ गट एकूण ८० चित्रे) याप्रमाणे ३ विभागाची (दक्षिण/पश्चिम/उत्तर) एकूण २४० चित्रे विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, चर्नीरोड, मुंबई यांना सादर करावीत.
जिल्हास्तरीय निवड समिती :-
तालुका स्तरावरुन तसेच महानगपालिकेतील शिक्षण विभागाकडून निवड केलेल्या चित्रांमधून जिल्हा पातळीवरील प्रत्येक गटातील ४ अशी एकूण १६ चित्रकामे निवड करण्याकरिता बृहन्मुंबई वगळता सर्व जिल्ह्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून खालील ९ सदस्यांचा समावेश असलेली जिल्हास्तरीय निवड समिती गठित करुन आदेश निर्गमित करतील.
बृहन्मुंबईकरिता निवड समितीः-
बृहन्मुंबई शिक्षण निरीक्षक (दक्षिण/पश्चिम/उत्तर) यांचेकडून निवड केलेल्या चित्रांमधून जिल्हा पातळीवरील प्रत्येक गटातील ४ अशी एकूण १६ चित्रकामे त्यानुसार ३ विभागाची (दक्षिण/पश्चिम/उत्तर)
एकूण ४८ चित्रकामे निवड करण्याकरिता बृहन्मुंबईकरिता शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, चर्नीरोड मुंबई यांच्याकडून खालील ७ सदस्यांचा समावेश असलेली जिल्हास्तरीय निवड समिती गठीत करुन आदेश निर्गमित करतील.
शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / शिक्षणाधिकारी (प्राथमिक)/शिक्षण निरीक्षक यांचेकरिता मार्गदर्शक सूचना-
१) सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) / शिक्षण निरीक्षक दक्षिण/पश्चिम/उत्तर (बृहन्मुंबई) हे महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या www.msbae.ac.in या संकेतस्थळावर किंवा https://balchitrakala2026.msbae.in या लिंकवर स्वतःचा लॉगिन तयार करतील.
२) स्वतःचा लॉगीन तयार केल्यानंतर त्यांच्या कार्यक्षेत्रातील तालुकानिहाय गट शिक्षणाधिकाऱ्यांचे लॉगीन तयार करुन लॉगीन आय डी व पासवर्ड सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांना उपलब्ध करुन देतील. बृहन्मुंबईकरिता वरील संकेतस्थळावर विभागीय शिक्षण उपसंचालक, शालेय शिक्षण संचालनालय, चर्नी रोड, मुंबई यांनी लॉगिन करावे.
३) गट शिक्षणाधिकाऱ्याकडून प्राप्त झालेल्या प्रत्येक गटाचे २० असे एकूण ८० चित्रांची माहिती आपल्या लॉगिनमध्ये उपलब्ध होईल तसेच ऑफलाईन पध्दतीने सर्व चित्रे गटशिक्षणाधिकारी सादर करतील.
४) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वरील समिती सदस्यांची निवड करून समिती गठीत करतील.
५) उपरोक्त जिल्हा पातळीवरील समितीमधील तीन सदस्यांची “निवड समिती” गठीत करण्यात येईल. (निवड समितीमधील दोन सदस्य दृष्यकलेचे शिक्षण प्राप्त केलेले असतील.)
६) तालुका पातळीवरील समितीकडून प्राप्त झालेल्या चित्रांमधून ड्रॉईंग पेपरचे निवड समितीमार्फत गटनिहाय वर्गवारी करेल.
७) वर्गवारी केल्यानंतर निवड समितीमार्फत प्रत्येक गटासाठी ४ विजेते (पहिले-१, दुसरे-१, तिसरे-१ व चौथे-१ एकूण १६ विद्यार्थी निवडण्यात येतील. बक्षिसपात्र विद्यार्थ्यांची यादी ऑनलाईन पध्दतीने लॉगीन
मध्ये नमूद करुन सादर करावी तसेच संबंधित विद्यार्थ्यांची चित्रे संचालक, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्याकडे दि.०१.०९.२०२६ पर्यंत हस्तपोच/स्पीड पोस्टने सादर करतील.
८) जिल्हा स्तरावर निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल शक्यतो दिनांक १ ऑक्टोबर, २०२६ पूर्वी महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या www.msbae.ac.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
९) बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचे/पालकांचे बँक खात्याची माहिती ऑनलाईन स्वरुपात महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाच्या www.msbae.ac.in या संकेतस्थळावर किंवा https://balchitrakala2026.msbae.in या लिंकवर संबंधित मुख्याध्यापकाच्या लॉगिन मधून भरण्यात यावी.
१०) बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या बक्षीसाची रक्कम महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांचे/पालकांचे थेट बँक खात्यावर जमा करण्यात येईल.
११) बक्षिसपात्र व गुणवत्ता पात्र विद्यार्थ्यांची प्रमाणपत्र शक्यतो दिनांक १० नोव्हेंबर, २०२६ पर्यंत सर्व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना पाठविण्यात येतील.
१२) सर्व बक्षिसपात्र व गुणवत्ता पात्र विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र वितरण दिनांक १४ नोव्हेंबर, २०२६ (बालदिनी) शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याकडून तसेच बृहन्मुंबईकरिता शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, मुंबई यांच्याकडून करण्यात येईल.
राज्यस्तरीय निवड समिती :-
राज्य पातळीवरील बक्षिसांसाठी चित्रे निवडण्यासाठी संचालक, कला संचालनालय यांच्या अध्यक्षतेखाली वरीलप्रमाणे तीन सदस्यीय समिती गठीत करण्यात येईल.
१. जिल्हा स्तरावर बक्षिसपात्र व गुणवत्ता प्रमाणपत्राकरिता निवड करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या/यादी गटनिहाय ऑनलाईन पध्दतीने प्राप्त होईल. तसेच चित्रे ऑफलाईन पध्दतीने प्राप्त होतील.
२. प्राप्त चित्रांचे वरील निवड समितीमार्फत प्रत्येक गटासाठी ४ विजेते (पहिले-१, दुसरे-२, तिसरे-३ व चौथे-१) एकूण १६ राज्यस्तरीय बक्षिसे तसेच, प्रत्येक गटातील विजेत्यांखेरीज पाच स्पर्धकांची गुणवत्ता प्रमाणपत्रासाठी निवड करण्यात येईल.
३. राज्यस्तरावर बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना बक्षीसाची रक्कम व प्रमाणपत्र कला संचालनालयाकडून सन २०२६-२७ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या राज्य कला प्रदर्शन (विद्यार्थी विभाग) उदघाटनप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.










