पवित्र पोर्टलवर उमेदवारांना प्राधान्यक्रम generate व lock करण्याची सुविधा दिल्यानंतर उमेदवारांकडून इमेल द्वारे विचारणा करण्यात आलेल्या समस्यांबाबत शंका-निरसन pavitra portal shikshak bharti 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पवित्र पोर्टलवर उमेदवारांना प्राधान्यक्रम generate व lock करण्याची सुविधा दिल्यानंतर उमेदवारांकडून इमेल द्वारे विचारणा करण्यात आलेल्या समस्यांबाबत शंका-निरसन pavitra portal shikshak bharti 

१. प्रश्नःस्व-प्रमाणपत्रामध्ये (नाव, शैक्षणिक, व्यावसायिक अर्हता, इत्यादी) दुरुस्ती अथवा नव्याने नोंद करावयाची आहे?

उत्तरः नाही, सद्य:स्थितीत स्व-प्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल करता येणार नाही.

२. प्रश्नः स्व-प्रमाणपत्र (SelfCertification) बाबत काय अपडेट आहे?

उत्तर:स्व-प्रमाणपत्रकरण्याची मुदत ही १५ डिसेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत देण्यात आली होती. सदर कालावधीत उमेदवारांना नोंद केलेली माहिती मध्ये बदल, दुरुस्ती, वाढ करण्याची सुविधा देण्यात आली होती. या मुदतीनंतर स्व प्रमाणपत्र (SelfCertification) मध्ये कोणताही बदल करता येणार नाही.

३. प्रश्नः उच्च माध्यमिक वाणिज्य शाखेच्या पदांचे प्राधान्यक्रम का उपलब्ध होत नाहीत?

उत्तरः उच्च माध्यमिक वाणिज्य शाखेच्या रिक्त जागांच्या जाहिराती आलेल्या नसल्यामुळे या पदांचे प्राधान्यक्रम उपलब्ध होणार नाहीत.

४. प्रश्नः प्राधान्यक्रम (Preferences) नेमके कोणत्या उमेदवारांना जनरेट होतील?

उत्तर:ज्या विषयांसाठी, माध्यमासाठी व गटांसाठीच्या जाहिराती असतील आणि उमेदवार त्या जागांसाठी आरक्षणासह शैक्षणिक, व्यावसायिक अर्हता व इतर अर्हता धारण करत असतील व त्याप्रमाणे स्व-प्रमाणपत्रात नोंदी केलेल्या असतील त्यांनाच प्राधान्यक्रम जनरेट होतील.

५. प्रश्नः प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी नवीन वाढीव मुदत कोणती आहे?

उत्तरः प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदतदिनांक १६/०८/२०२६पर्यंत वाढविण्यात आली आहे.

६. प्रश्नः वयोमर्यादेचा नियम काय आहे?

उत्तर: इयत्ता १ ली ते ८ वी व शासकीय व्यवस्थापनांच्या पदांसाठीशासन नियमानुसार वयोमर्यादा लागू राहील. तसेच खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांतील इयत्ता ९ वी ते १२ वी करिता कमाल वयोमर्यादालागू नसल्याने उमेदवार पात्र असल्यास प्राधान्यक्रम उपलब्ध होतात.

७. प्रश्नः नोंदणीकृत मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी काय करावे लागेल?

उत्तर: नोंदणीकृत मोबाईल क्रमांक बदलण्यासाठी विहित मुदतीत नजीकच्या शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य) कार्यालयाशी संपर्क साधावा.

८. प्रश्नः अर्ज प्रक्रियेत अडचणी आल्यास उमेदवारांनी कोणत्या सूचनांचे पालन करावे?

उत्तर: उमेदवारांनी पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

९. प्रश्नः भरती प्रक्रियेबाबत अचूक माहितीसाठी काय करावे?

उत्तर: उमेदवारांनी पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकनकरावे.

१०. प्रश्नः लॉगिन करण्यासाठी आयडी (Login ID) कसा वापरावा आणि कोणत्या विशेष सूचना वाचाव्यात?

उत्तर: २५_(तुमचा TAIT ID) हा लॉगिन आयडी वापरावा. तसेच दि. ०६/०८/२०२६ मधील सूचना क्र. २७ अ., २९, ३७ व दि. ०८/०८/२०२६ मधील सूचना क्र. ३ आणि ४ काळजीपूर्वक वाचून पुन्हा लॉगिन करावे.

१२. प्रश्न प्राधान्यक्रम केवळ जनरेट केले, परंतु लॉक केले नाहीत. ते ग्राह्य धरले जातील का?

उत्तर : निवडप्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर केवळ लॉक केलेले प्राधान्यक्रमच विचारात घेतले जातात. विहित मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करणे आवश्यक आहे. लॉक न केलेले प्राधान्यक्रम ग्राह्य धरले जाणार नाहीत.

१३. प्रश्नः शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता कोणत्या दिनांकापर्यंत धारण करणे आवश्यक आहे?

उत्तर : उमेदवारांनी पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकनकरावे.

१४. प्रश्न पोर्टलवर लॉगीन करताना ओटीपी प्राप्त होत नाही.

उत्तर : ओटीपी विषयक अडचण दूर करण्यात आली आहे. कृपया पुन्हा लॉगीन करून प्रयत्न करावा.

Related posts:

Leave a Comment