उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना (TAIT-2025) pavitra portal shikshak bharti instructions
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत व लॉक करण्याबाबत.
१. पवित्र पोर्टलवर सध्या स्व- प्रमाणपत्र पूर्ण असलेल्या १,७०,१०८ उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची कार्यवाही सुरु आहे. खालील प्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहे.
C) आज दुपारी ५.३० वाजेपर्यंत मुलाखतीशिवाय- १,४८, ३१२, मुलाखतीसह – १,३९,०८३ पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत.
D) आज दुपारी ५.३० वाजेपर्यंत मुलाखतीशिवाय १,३४,६८५, मुलाखतीसह – १,१३,६५९ पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक झालेले आहेत.
२. वरील प्रमाणे उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट व लॉक झालेले आहेत. मुलाखतीशिवाय – १३,६२७, मुलाखतीसह २५,४२४ एवढ्या उमेदवारांनी अद्यापही प्राधान्यक्रम जनरेट असताना देखील लॉक केलेले नाहीत, अशा उमेदवारांनी लॉक करण्याची मुदत दिनांक १६/०८/२०२६ रोजी असल्याने तात्काळ प्राधान्यक्रम लॉक करावेत.
३. जे उमेदवार प्राधान्यक्रम लॉक करणार नाहीत, ते प्राप्त असलेल्या जाहिरातीच्या निवड प्रक्रियेत विचारात घेतले जाणार नाहीत.
४. आयुक्त, महानगर पालिका नाशिक यांनी पवित्र पोर्टलवर जाहिरात (२७२०MCS ०१) दिली आहे, सदर जाहिरात विना अनुदानित माध्यमिक शाळांची असून त्यामध्ये वेतनश्रेणी ऐवजी पहिले तीन वर्ष शिक्षण सेवक पदाचे एकत्रित मानधन देय राहील असे कळविले आहे त्यानुसार संबंधित उमेदवार यांनी नोंद घ्यावी.
५. प्राधान्यक्रमाबाबत उमेदवारांकडून येत असलेल्या तक्रारी विचारात घेता स्व प्रमाणपत्रामध्ये नोंद केलेल्या त्यांच्या पात्रतेनुसार जाहिरातीतील पात्रता पाहण्याची सुविधा उमेदवारांच्या लॉगीनमध्ये Preferences Why Not Eligible या मेनूअंतर्गत देण्यात आलेली आहे. प्राधान्यक्रम जनरेट होत असले तरी प्रत्यक्षात आपली पात्रता असलेले प्राधान्यक्रमच लॉक करण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी.











