ज्येष्ठतासूची, निवडसूची, पदोन्नतीने सेवार्थ क्रमांक व महाआयडीचा समावेश पदस्थापना व मानीव दिनांकाच्या आदेशांमध्ये करण्याबाबत मार्गदर्शक सूचना jeshthata suchi nivadsuchi promotion circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ज्येष्ठतासूची, निवडसूची, पदोन्नतीने सेवार्थ क्रमांक व महाआयडीचा समावेश पदस्थापना व मानीव दिनांकाच्या आदेशांमध्ये करण्याबाबत मार्गदर्शक सूचना jeshthata suchi nivadsuchi promotion circular 

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय क्रमांक एसआरव्ही-२०२६/प्र.क्र.५७/का.१२ (सेवा)

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०००३२. दिनांक- १७ नोव्हेंबर २०२६

१. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही-२०२५/प्र.क्र. १५९ / का.१२ (सेवा), दिनांक १ ऑगस्ट २०१९.

२. शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-एसआरव्ही-२०१६/ प्र.क्र.२८१/ का.१२ (सेवा), दिनांक २१ जून, २०२१.

३. शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण-१७२५/प्र.क्र.२५१/मातं. दिनांक २७ मार्च, २०२६

प्रस्तावना-

राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या अनुषंगाने संदर्भाधीन शासन निर्णय क्र.१ मधील विहित कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यात येते. राज्यातील संवर्गनिहाय सेवाविषयक बाबीसाठी महासंवर्ग आढावा पोर्टल (MahaCadre Review Portal) विकसित करण्यात आले आहे. तसेच, राज्य शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबींचे स्वयंचलन करण्यासाठी “Maha_eHRMS” प्रणाली विकसित करण्यात आली असून, भविष्यात सदर प्रणालीचे “महार्सवर्ग आढावा पोर्टल” सोबत Integrate करण्याचे नियोजन आहे. या अनुषंगाने अधिकारी/कर्मचा-यांची अचूक ओळख सुनिश्चित करण्यासाठी ज्येष्ठतासूची, निवडसूची, पदोन्नतीने पदस्थापना आदेश व मानीव दिनांकाचे आदेश यामध्ये संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्याचा सेवार्थ क्रमांक व महाआयडी यांचा उल्लेख असणे आवश्यक आहे.

२. महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१, दिनांक २१ जून, २०२१ अन्वये प्रत्येक सक्षम प्राधिकाऱ्याने त्याच्या नियंत्रणाखालील प्रत्येक संवर्गाची दिनांक १ जानेवारी रोजीची अंतिम ज्येष्ठतायादी विहित नमुन्यात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. सदर ज्येष्ठतायादीच्या विहित नमुन्यात अधिकारी/कर्मचाऱ्याचा सेवार्थ क्रमांक व महाआयडी नमूद करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय –

महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ याच्या परिशिष्ट-तीन मधील विहित नमुन्यात, स्तंभ (२) नंतर पुढील दोन स्तंभांचा समावेश करण्यात येत आहे :-

स्तंभ (२ अ) सेवार्थ क्रमांक

– स्तंभ (२ ब) महाआयडी

२. त्यानुसार महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली, २०२१ मधील परिशिष्ट-तीन मधील नमुन्यात बदल झाल्याचे समजण्यात येईल, सदर सुधारित नमुना परिशिष्ट-तीन सोबत जोडण्यात येत आहे.

३. या शासन निर्णयाच्या दिनांकापासून प्रत्येक सक्षम प्राधिकाऱ्याने त्याच्या नियंत्रणाखालील प्रत्येक संवर्गाची ज्येष्ठतायादी सोबत जोडलेल्या सुधारित परिशिष्ट-तीनमधील नमुन्यानुसार प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. अंतिम ज्येष्ठतायादी प्रसिद्ध करताना सुधारित परिशिष्टामध्ये संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याचा सेवार्थ क्रमांक व महाआयडी अचूकपणे नमूद करण्याची दक्षता घ्यावी.

४. प्रत्येक विभागाने निवडसूची तयार करताना, पदोन्नतीने पदस्थापना आदेश व मानीव दिनांकाचे आदेश निर्गमित करताना, संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्याच्या नावापुढे सेवार्थ क्रर्माक व महाआयडी नमूद करावा.

५. वरीलप्रमाणे माहिती नमूद करताना संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्याचा सेवार्थ क्रमांक व महाआयडी यांची पडताळणी करूनच ती नमूद करण्यात यावी, सदर माहितीचा वापर केवळ अधिकृत सेवाविषयक कामकाजासाठी करण्यात यावा.

६. संदर्भाधीन शासन निर्णय क्र. ३ मध्ये नमूद सुचनांनुसार संबंधित प्रशासकीय विभागाने संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्याचा महाआयडी प्राप्त करुन घ्यावा.

७. प्रत्येक प्रशासकीय विभागाने सदर परिपत्रक आपल्या विभागाच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयांच्या निदर्शनास आणून द्यावे व त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचना द्याव्यात.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२६१११७१८०६१९५६०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने

साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Related posts:

Leave a Comment