महत्त्वाचे वाक्यप्रचार व त्याचा अर्थ शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेसाठी उपयुक्त important vakyaprachar and means 

महत्त्वाचे वाक्यप्रचार व त्याचा अर्थ शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेसाठी उपयुक्त important vakyaprachar and means 

डोळा लागणे – झोप येणे

डोळे उघडणे -अनुभवाणे सावध होणे

डोळे निवणे – समाधान होणे

डोळे पांढरे होणे – मोठा धक्कादायक प्रसंग निर्माण होणे

डोळ्यांतून थेंब न काढणे – न रडणे

डोळ्यांवर येणे – लक्षात येणे

डोळ्याला डोळा न लागणे – झोप न येणे

डोळा असणे – पाळत ठेवणे

डोळे मिटणे – मरण पावणे

डोळे वटारणे – रागावणे

डोळे विस्फारणे – आश्चर्याने पाहणे

डोळेझाक करणे – दुर्लक्ष करणे

तळपायाची आग मस्तकी जाणे – अतिशय संतापने

तोंड काळे करणे – कायमचे निघून जाणे

तोंड देणे – सामना करणे

तोंड फिरवणे – नाराजी व्यक्त करणे

तोंड भरून बोलणे – मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे

तोंड वेंगाडणे – याचना करणे

तोंड सांभाळून बोलणे – जपून बोलणे

तोंडघशी पडणे- विश्वासघात होणे

तोंडघशी पाडणे – विश्वासघात करणे

तोंडचे पाणी पळणे – अतिशय घाबरने

तोंडसुख घेणे – दोष देताना वाटेल तसे बोलणे

तोंडाची वाफ दवडणे – वायफळ बडबड करणे

तोंडात बोट घालणे – आश्चर्यचकित होणे

तोंडात शेण घालणे – परा कोटीची निंदा करणे

तोंडाला कुलूप घालणे – गप्प बसणे

तोंडाला तोंड देणे – भांडणे

तोंडाला पाणी सुटणे – हाव निर्माण होणे

दात धरणे – सूड घेण्याची भावना बळवने

दात विचकणे – निर्लज्जपणे हसणे

दातओठ खाणे – चीड व्यक्त करणे

दाताच्या कण्या करणे – वारंवार विनंती करणे

दाती तृण धरणे – सर्व अर्थाने शरण जाणे

Leave a Comment