जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया 2025 बदलीस पात्र शिक्षक विस्थापित राऊंड intra district online transfer visthapit round
🔯 *(विस्थापित राऊंड)* 🔯
1️⃣ *निराशेतून आशेचा किरण शोधणारा संवर्ग म्हणजे विस्थापित राऊंडमधील शिक्षक होय.*
2️⃣ *अपयश ही यशाची पहिली पायरी* *आहे,असे मानून बदलीला आत्मविश्वासपूर्ण तोंड देणारा संवर्ग म्हणजे विस्थापित राऊंडमधील शिक्षक होय.*
3️⃣ *धाडसी निर्णय घेऊन बदली करुन घेणारा संवर्ग म्हणजे विस्थापित राऊंडमधील शिक्षक होय.*
4️⃣ *सुधारित रिक्त पदांची (अपडेट रिक्त पदांची) जाहीर केली जाते.*
5️⃣ *संवर्ग 4 मधून ज्यांची बदली झाली नाही, अशा शिक्षकांना विस्थापित राऊंडमधून फाॅर्म भरणे आवश्यक असते.*
6️⃣ *सेवाज्येष्ठतेनुसार बदलीची प्रक्रिया केली जाते.*
7️⃣ *पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा कालावधी दिला जातो.*
8️⃣ *सर्व शिक्षकांना किमान 30 अथवा उपलब्ध रिक्त जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य असते.*
9️⃣ *शिक्षकांनी पसंतीक्रम न दिल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाते.*

1️⃣0️⃣ *शिक्षकांनी निवडलेल्या पसंतीक्रमातील जागा उपलब्ध नसल्यास, उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाते.*
1️⃣1️⃣ *पसंतीक्रम देताना अतिशय अभ्यासपूर्ण पसंतीक्रम देणे आवश्यकच असते.*
1️⃣2️⃣ *पसंतीक्रम निवडताना आपली सेवाज्येष्ठता व योग्य रिक्त पदांचा ताळमेळ साधून अचूक पसंतीक्रम देणे गरजेचेच असते.*
1️⃣3️⃣ *शांत डोक्यानी अचूक निर्णय घेणे गरजेचेच असते.*
1️⃣4️⃣ *पहिल्या दिवशी कच्च्या कागदावर आपल्या पसंतीक्रमानुसार शाळांची निश्चिती करावीच लागते.*
1️⃣5️⃣ *दुसर्या/ तिसर्या दिवशी मनाची खात्री झाल्यानंतरच पसंतीक्रम ऑनलाईन भरणे गरजेचेच ठरते.*
1️⃣6️⃣ *चौथ्या दिवशी धावपळ होण्याची शक्यता असते.*
1️⃣7️⃣ *महिला शिक्षकांनी अतिशय दक्षतेने पसंतीक्रमांची निश्चिती करुनच*
*पसंतीक्रम भरणे गरजेचेच असते.*
1️⃣8️⃣ *मन व बुध्दीचातुर्य यांचा सुवर्णमध्य साधून बदलीला तोंड देणे आवश्यकच ठरते.*
1️⃣9️⃣ *आपल्या मनाचे खच्चीकरण होण्यापासून दूरच राहणे गरजेचे ठरते.*
2️⃣0️⃣ *आपण निवडललेले पसंतीक्रम जास्तीत जास्त प्रमाणात वाया जाऊ देऊ नये.*
2️⃣1️⃣ *दुसर्यांचे पसंतीक्रम बघताना, आपली सेवाज्येष्ठता व आपले निवडललेले पसंतीक्रम अचूक असल्याची स्वतः मनाची खात्री करुन घेणे गरजेचेच असते.*
2️⃣2️⃣ *विस्थापित राऊंडमधील* *एकूण शिक्षक,आपली* *सेवाज्येष्ठता,उपलब्ध जागा,पसंतीक्रम मागणीचा कल या चार बाबींचा योग्य* *समन्वय साधून अचूक पसंतीक्रम निवडावे लागतात.*
2️⃣3️⃣ *पसंतीक्रम निवडून शाळा निश्चिती करण्याची ही शेवटचीच संधी असते.*
2️⃣4️⃣ *आपण स्वतः सखोल, सविस्तर, काळजीपूर्वक, अभ्यासपूर्ण माहिती घेऊनच आपण पसंतीक्रम निवडणे खूपच आवश्यक असते.*
👍👍🙏🙏🙏











बरेशच्या सेवाजेष्ठ शिक्षकांनी प्रशासकीय फार्म शेवटच्या क्षणी भरले त्यामुळे माझी बदली झाली . नाहीतर बहती झाली नसती