राष्ट्रीय पोषण सप्ताह (1 ते 7 सप्टेंबर) साजरा करण्याबाबत rashtriy poshan saptah paripatrak

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय पोषण सप्ताह (1 ते 7 सप्टेंबर) साजरा करण्याबाबत rashtriy poshan saptah paripatrak

विषयः राष्ट्रीय पोषण सप्ताह (1 ते 7 सप्टेंबर) साजरा करण्याबाबत. संदर्भः- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जालना यांच्या सूचना दि. 01/09/2025

उपरोक्त संदर्भीय विषयी आपणास सूचित करण्यात येते की, केंद्र सरकारतर्फे दरवर्षी 01 ते 07 सप्टेंबर हा “राष्ट्रीय पोषण सप्ताह” म्हणून साजरा केला जातो. यावर्षीची थीम आहे: “चांगल्या जीवनासाठी योग्य खा” (Eat Right for Better Life) या आठवड्याचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये पोषण, संतुलित आहार, स्वच्छता आणि आरोग्य याबाबत जागरूकता निर्माण करणे हे आहे. त्यानुषंगाने आपल्या अधिनस्त प्रत्येक पात्र शाळेत खालील उपक्रम राबविण्यात यावेतः

1. वि‌द्यार्थी व पालकांसाठी जनजागृती सत्र आयोजित करणे सदर जनजागृती सत्रातून संतुलित आहाराचे महत्त्व, पोषणयुक्त अन्नपदार्थाची माहिती देणे.

2. प्रदर्शनी व पोस्टर स्पर्धा घेणे पोषण व आरोग्यावर आधारित चित्रकला, घोषवाक्य, पोस्टर प्रदर्शन.

3. प्रात्यक्षिके पौष्टिक पदार्थ तयार करण्याचे सोपे मार्ग दाखवणे.

4. व्याख्यान डॉक्टर, आहारतज्ज्ञ किंवा आरोग्य कार्यकर्त्यांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात यावा.

5. घोषवाक्य व निबंध लेखन स्पर्धा “पोषणयुक्त आहार निरोगी आयुष्य” या विषयावर.

पोषण सप्ताहात आयोजित सर्व कार्यक्रमांत विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असावा. उपक्रमांचे शाळानिहाय फोटो व संक्षिप्त अहवाल मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निदर्शनास आणण्यासाठी दिनांक 8 सप्टेंबर 2025 नंतर प्रस्तुत कार्यालयास सादर करावा.

Related posts:

Leave a Comment