संस्थात्मक कोट्यातील प्रवेश आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया नंतर रिक्त जागां साठी प्रवेश प्रक्रिये करिता cet rajya samaik pravesh pariksha 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संस्थात्मक कोट्यातील प्रवेश आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया नंतर रिक्त जागां साठी प्रवेश प्रक्रिये करिता cet rajya samaik pravesh pariksha 

महत्वाची सूचना

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या संस्थांचे संचालक किंवा प्राचार्य संस्थात्मक कोट्यातील प्रवेश आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया नंतर रिक्त जागांसाठी माहिती पुस्तिकेतील नियम क्र १३. नुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात यावी. सदर प्रवेश प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने आणि विद्यार्थ्यांच्या इंटर-से-मेरिट नुसारच पार पाडण्यात यावी. तसेच प्रवेशाचे नियम निर्दिष्ट करणारी माहिती पुस्तिका, तसेच संस्थांनी विद्यार्थ्यांचे अर्ज मागविण्याकरिता जाहिराती आणि संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रियेच्या संपुर्ण वेळापत्रकासह उपलब्ध जागांची माहिती संस्थेच्या वेबसाइटवर प्रदर्शित करावी.

पात्र उमेदवार संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रिये करीता संबंधित संस्थेकडे अर्ज करतील. जे उमेदवार संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रिये करिता संबंधित संस्थेकडे अर्ज करू शकले नाहीत, अशा उमेदवारांसाठी सीईटी पोर्टलवर संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रिये करिता ऑपशन फॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांनी सीईटी पोर्टलवर संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रिये करिता ऑपशन फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी संबंधित संस्थेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे.

संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रिये करिता संबंधित संस्थेकडे आलेले अर्ज आणि सीईटी सेल मार्फत दिलेली संस्थानिहाय विद्यार्थ्यांची यादी यांचा एकत्रित विचार करून संस्थांनी इंटर-से-मेरिट गुणवत्ता यादी तयार करुन संबंधीत संस्थांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावी.

ज्या संस्थांनी संस्था स्तरावरील जागा आत्मसमर्पित (Seat Surrender) केलेल्या आहे किंवा संस्था स्तरावरील कोटा उपलब्ध नाही, अशा संस्थांना फक्त केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया नंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठीच संस्थात्मक प्रवेश प्रक्रिया राबवतील. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया नंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविताना, ज्या प्रवर्गासाठी जागा आरक्षित केलेली आहे त्याच प्रवर्गातील विद्याथ्याला प्राधान्याने जागा वाटप करण्यात यावे.

माहिती पुस्तिकातील नियम क्रमांक १५ नुसार, प्रवेशीत विद्यार्थ्यांकरिता काही कारणास्तव प्रवेश रद्द करावयाचा असल्यास, प्रवेश रद्द करण्यासाठी लिंक प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये प्रवेशाच्या अंतिम दिनांकापर्यंत (cut off date) उपलब्ध असेल. प्रत्येक अभ्यासक्रमांच्या वेळापत्रकामध्ये प्रवेश रद्द करुन पूर्ण शुल्क (except Security Deposit and Caution Money Deposit) परताव्यासाठीची शेवटची तारीख नमूद करण्यात आलेली असून विद्यार्थी/ पालक / संस्था यांनी नोंद घ्यावी.

 

Related posts:

Leave a Comment