जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन 2025 प्राथमिक शिक्षकांचे आदेश पारित न केले बाबत teacher online transfer portal
संदर्भ :- 1. आपलेकडील पत्र जिपब-1125/प्र.क्र. 14/आस्था-14 दि. 28 में 2025 2. श्री. सी. जी. गावणेकर, वकिल मुंबई हायकोर्ट यांनी दिलेले ओपिनियन दि. 11/09/2025
महोदय,
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये आपणास कळविण्यात येत आहे की, जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन 2025 मधील टप्पा क्र. 1 ते 5 मधील समाविष्ठ शिक्षकांची ऑन लाईन बदली पोर्टलव्दारे बदली झालेल्या 1472 प्राथमिक शिक्षकांचे कार्यमुक्त आदेश पारित करणेत आलेले नाही.
श्री. सी. जी. गावणेकर, वकिल मुंबई हायकोर्ट यांनी दिलेले ओपिनियन नुसार रानवडी बुद्रुक प्राथमिक जिल्हा परिषद शाळा आणि इतर विरुध्द महाराष्ट्र शासन याचिका क्र. 15761/2025 यांनी महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 15/03/2024 रोजीच्या संचमान्यतेचे सुधारीत निकष विहित करणे या शासन निर्णयास आव्हान दिले आहे.
सदरची याचिका क्र. 15760/2025 ही दुसरी याचिका क्र. 5456/2025 मध्ये समाविष्ठ आहे. मा.उच्च न्यायालयाने रिट याचिका क्र. 5456/2025 मध्ये दि. 23/04/2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार, शिक्षकांना एका विभागातून दुसऱ्या विभागात हलवण्याचे किंवा त्यांना अधिशेष घोषित करण्याचे आदेश रिट याचिकेची सुनावणी होईपर्यंत औपचारिक केले जाऊ नयेत, त्यामुळे जिल्हा परिषदेला आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र पाऊल उचलण्याची परवानगी राहणार नाही. असे कळविले आहे.
तरी श्री. सी. जी. गावणेकर, वकिल मुंबई हायकोर्ट यांनी मा. उच्चन्यायालय मुंबईच्या सुनावणी नुसार रायगड जिल्हा परिषद शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन 2025 मधील टप्पा क्र. 1 ते 5 मधील 1472 प्राथमिक शिक्षकांचे कार्यमुक्त आदेश पारित करणेत बाबत मार्गदर्शन मिळावे.
सोबत जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 2025 झ्याल्यानंतरची स्थिती दर्शविणार तक्ता जोडणेत आला आहे.










