प्रजासत्ताक दिन मुद्देसूद सूत्रसंचालन सुंदर देशभक्तीपर गीते व मराठी चारोळ्या pdf उपलब्ध anchoring on republic day
🎇 मान्यवरांचे स्वागत
🎇कार्यक्रमाचे प्रास्ताविक
🎇अध्यक्ष निवड
🎇 प्रमुख पाहुण्यांचा परिचय
🎇दीप प्रज्वलन /प्रतिमेचे पूजन
🎇ध्वजारोहण कार्यक्रम
🎇राष्ट्रगीत,
🎇ध्वज गीत,
🎇देशभक्तीपर गीत गायन
🎇सांस्कृतिक कार्यक्रम
🎇मुलांचे भाषणे,
🎇मान्यवरांची भाषणे
🎇अध्यक्षिय भाषण
🎇आभार प्रदर्शन
🎇आभार प्रदर्शन
🎇वंदे मातरम् राष्ट्रीय गीताने समारोप
कार्यक्रमाची सुरुवात सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम
स्वागतासाठी चारोळी
“उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला !
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला !
ज्यांनी लिहिली आजादीची आणि प्रजासत्ताकाची गाथा
त्यांच्या चरणी ठेवितो माथा !!”
सर्वप्रथम भारत मातेला वंदन करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो/करते. मित्रांनो, आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन होय. आपला भारत देश 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक बनला संपूर्ण देशामध्ये संविधान लागू करण्यात आले. प्रज्या म्हणजे जनता सत्ताक म्हणजे सत्ता याचाच अर्थ प्रजेच्या हाती सत्ता होय.
सुंदर चारोळी
” सर्वजण ज्या मंगल दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट….
सूर्यकिरणांनी मिटला अंधार अन् झाली प्रजासत्ताकाची पहाट…. ”
आजच्या या मंगलमय प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हां सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
प्रास्तविक
सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवर, पालक मंडळी, प्रतिष्ठित नागरिक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांचे मी……….. या ठिकाणी सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत करतो व आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी श्री………….सर यांना आमंत्रित करतो.
सुंदर चारोळी
” मंगल क्षणी या निनादण्याचे भाग्य लाभले चौघड्याला आसमंत तिरंग्यांनी नटले प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला”
आजच्या या पवित्र सोहळ्याला उपस्थित सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो आणि प्रास्ताविकास सुरुवात करतो.
अशा प्रकारे सुरुवात करून आपले प्रास्ताविक पूर्ण करावे. प्रास्ताविकामध्ये प्रजासत्ताक दिनाविषयी माहिती सांगावी.
अध्यक्ष निवड
(प्रास्ताविक झाल्यानंतर )
प्रास्ताविकातून कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा स्पष्ट केली. यानंतर आजच्या या सोहळ्याचे अध्यक्ष स्थान सन्माननीय श्री……………. यांनी भूषवावे अशी मी त्यांना विनंती करतो/करते.
अनुमोदन
( आजच्या कार्यक्रमाला जे अध्यक्ष निवडणार आहात त्यांचे नाव घ्यायचे आहे. यानंतर अध्यक्ष निवड साठी पुढीप्रमाणे अनुमोदन द्यावे ) आत्ताच श्री……………. सरांनी केलेल्या अध्यक्ष निवडीला मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो.
दिप प्रज्वलन व प्रतिमा पूजन
सुंदर चारोळी
“अज्ञान, भ्रष्टाचार, गरिबीचा अंधार दूर करण्यासाठी
मना मनात देश प्रेमाचा दीप पेटवूया
अध्यक्ष आणि मान्यवरांच्या हस्ते
प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलन करूया.”
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री………… सर व सर्व उपस्थित मान्यवर यांना विनंती करतो/करते की त्यांनी भारत मातेचे प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करावे ही विनंती.
( प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलन चालू असताना पुढील चारोळी म्हणावी)
“प्रियतम आमची भारत माता, आम्ही सारी तिची मुले
रंग वेगळे गंध वेगळे, तरी येथली सर्व फुले
प्रियतम आमची भारत माता, वंदन आम्ही तिला करू
या मातेची मुले लाडकी सदा तीचा ध्वज उंच धरु !!”
प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलन झाल्यानंतर चारोळी
“देश प्रेमाचे प्रतिक तिरंगा,
तभी लहरूया उंचच उंच ||
जय हिंद जय भारत या जयघोषाने,
,गर्जू दे सारा आसमंत…”
मित्रांनो यानंतर शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय अध्यक्ष यांच्या हस्ते ध्वज स्तंभाचे पूजन आणि ध्वजारोहण करावे याबाबत विनंती करावी.
यावेळी सर्व मुलांना सावधान/विश्राम करून सावधान स्थितीत उभे करावे. ध्वजारोहण झाल्यानंतर सर्वांना ध्वजाला सलामी देण्याची ऑर्डर द्यावी आणि राष्ट्रगीत गायनास सुरुवात करावी. झेंडा गीत आणि देशभक्तीपर गीताचे गायन घेण्यात यावे आणि त्यानंतर घोषणा देण्यात याव्या.
घोषणा देऊन झाल्यानंतर चारोळी
“डौलाने फडकतो तिरंगा
मनामनास देतो स्फूर्ती
साऱ्या विश्वात निनादत राहो
प्रिय भारतभूची कीर्ती
प्रिय भारतभूची कीर्ती ”
यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांची भाषणे यासाठी चारोळी
” तिरंगा आहे मान आमचा तिरंगा आहे सन्मान
आमचा मानवंदना देऊ तयाला आज प्रजासत्ताक दिनाला..”
आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व थोर नेत्यांचे स्मरण करण्यासाठी आणि तिरंग्याला मानवंदना देण्यासाठी विद्यार्थ्यांची भाषणे
सुंदर चारोळी
” रवी किरणांनी न्हावू घातले भारत भूमीला आज.. प्रजासत्ताक दिनाची पहाट नटली तिरंग्याचा लेऊन साज.. मान्यवरांच्या विचारांचा लाभ घेऊया आज !!!
यानंतर मान्यवरांची भाषणे घ्यावीत



