सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नृत्य च्या आधी च्या चारोळ्या सूत्र संचालनासाठी उपयुक्त sanskrutik karyakram anchoring 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नृत्य च्या आधी च्या चारोळ्या सूत्र संचालनासाठी उपयुक्त sanskrutik karyakram anchoring 

1. भारताच्या सरहद वर आपल्या साठी जिवाची पर्वा न करता आपल्या भारत मायेच्या सेवेत रक्षणासाठी ऊन वारा पाऊस यांची पर्वा न करता आपण सुखाची झोप यावी या करता हे सैनिक लढत असतात आपल्या घरा पासून आपल्या गावा पासून हजारो कि.मी लांब असतात जेव्हा त्यांना आपल्या घरच्या च्या खुशाली चा संदेश येतो तेव्हा नकळतच डोळ्यातून अश्रू वाहू लागतात अशा या महान सुपुत्राना मानाचा सलाम मानाचा सलाम… असेच घेऊन येतं आहेत गीत संदेशे आते है है गीत

2. वंशाला दिवा पाहिजे म्हणून कितेक जण मुलगी नको म्हणतात पण आज परिस्थिती बदली आहे मुलानं पेक्षा प्रत्येक क्षेत्रात मुली शिकल्या आहेत पुढे आहेत वंशाला दिवा नाही तर खरी गरज पणती ची आहे जी दोन्ही घरी प्रकाश देते. देव भाग्यवान च्या च घरी जन्माला मुलगी घालतो कारण मुली सारखं प्रेम मुलगा करत नाही भाग्यवान आहेत ते लोक ज्याच्या घरी सरस्वती, लक्ष्मी, पार्वती आहेत तेव्हा लेक वाचवा देश वाचवा मुलगा मुलगी एक समान देऊ दोघांना ही समान न्याय.

3. दिवसेन दिवस पाऊस जरी साथ देत नसला तरी आपण हतबल न होता आलेल्या संकटाला सामोरे गेले आज जिवनाला कंटाळून जगाचा पोशिदा हतबल होवून आत्महत्या करतो पण आत्महत्या ने प्रश्न सूडत नाही वाढतात घरचे मुले बाळ उघड्यावर येतात … तेव्हा घेऊन येतं आहेत आपल्या समोर नाटीका द्वारे असाच एक संदेश जहर खाऊ नका

4. मराठी शृंगाराचा काठोकाठ भरलेला चषक महणजे लावणी. ताल मृदुंगात रमलेले आपले मन ढोलकीचा ठेका ऐकला की, त्याच्याशी आपल्याही हृदयाचा ठोका नगतपणे जुळतोच. लावणी महणजे मराठी ऐश्वर्याची, मराठी खानदानाची, मराठी रसिकतेची, मराठी सौंदर्याची साक्षात बावन्नठणी प्रतिभाच. ढोलकीचा ताल आणि घुंघराचा बोल यांनी साकार झालेली लावणी ऐकुन कुणाचे मन हरकणार नाही. आपल्या नृत्याचा बहारदार आविष्कार सादर करण्यासाठी येत आहे.

5. अख्या महाराष्ट्राला ज्या आरची परशाने सैराट केले आहे ज्याच्या संगीतावर प्रत्येकजन फिदा आहे चर्चा फक्त त्याचीच आहे असा नागराज मंजुळे यांच्या चित्रपटातील तुफान फेमस गाणे घेऊन येत आहेत झिंग झिंग झिंगाट

6. मित्रानो, ज्या गीताने तरुणीचे मन बावरले, ज्या गीताने तरुणांना याड लावले, ज्या गीतिाशवाय नव्हती दुसरी कुठलीच चर्चा ज्या गीताने प्रत्येकजन समजु लागलेतत स्वतःला आर्ची अन् परश्या ज्या गीतावर तरूणासह म्हातारे ही नाचले करून थयथयाट अहो तेच ते सैराटमधील झिंग झिंग झिगाट……..

7. जगाच्या पाठीवर एक मेव असा कृषीप्रधान देश आहे जिथे अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नादतात ऐक्यने राहातात विविध आपल्या धर्मानुसार मिळून सण साजरे केले जातात. ऐसा देश म्हणजे भारत देश … याचं वर्णन पाहू या गीताच्या द्वारे ऐसा देश है मेरा

8. एक होता पेशवा नाव त्याचे बाजीराव आटकेपार रोवुन झेंडा मराठ्याचे केले नाव त्याची एक राणी नाव तिचे मस्तानी रुपाने होती इतकी देखनी, खालेले पान दिसे गर्दनी.. अशी आगळी वेगळी प्रेमकहानी… चित्रपट आहे बाजीराव मस्तानी… या एतिहासिक चित्रपटातील मराठमोळी संस्कृती दाखविणारे गीत घेऊन येत आहेत..

Leave a Comment