शैक्षणिक,सांस्कृतिक,निरोप समारंभ सूत्रसंचालन सर्व प्रकारच्या कार्यक्रमासाठी वापरता येणारी चारोळी sutrasanchalan charoli
कार्यक्रमाची रूपरेषा
१. मान्यवरांच, अतिथींच आणि श्रोत्यांच स्वागत
२. दिपप्रज्वलन
३. मान्यवरांच स्वागत सत्कार
४. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
५. अतिथींचे मनोगत
६. अध्यक्षीय समारोप
७. आभार प्रदर्शन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कार्यक्रमाची सुरूवात करण्यासाठी सुंदर चारोळी
माती आणि माता फरक आहे विलांटी चा
एक जन्म देते तर दुसरी कुशीत घेते
अशा या माती आणि मातेच्या पवित्र स्मृतीस
अभिवादन करून आजच्या या विशेष अशा
सोहळ्यात उपस्थितांच मी सहर्ष स्वागत करतो
स्वागतम, स्वागतम, सुस्वागतम ………
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎇शैक्षणिक कार्यक्रमासाठी स्वागताची चारोळी
ज्ञानियाचा अन तुकोबांचा तोच माझा वंश आहे
माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎇सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्वागताची चारोळी
विसरा साऱ्या आसवांना विसरा साऱ्या वेदना
विसरा सारे धर्म पंथ आणि त्यांच्या वाल्गना
या घडीला बांधवांनो हीच हृदयी भावना
या जपुया अभिमानाने संस्कृतीच्या पाऊलखुणा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎇निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी स्वागताची चारोळी
उगतीचे ऊन आता मावळतीला पोहोचले आहे
मार्गक्रमण मार्गापेक्षा स्मरणात अधिक साचले आहे
तक्रार नाही खंत नाही संपण्यासाठीच प्रवास असतो
एक दिवस मिटण्यासाठीच काळजा मधला श्वास असतो
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎇सर्व प्रकारच्या कार्यक्रमासाठी वापरता येणारी स्वागताची चारोळी
सज्जे सारे लोक आहे क्षण आले अमृताचे
उजळलेला मंच आहे तेज जैसे पौर्णिमेचे
त्या मनालाही कळाले भाव माझ्या या मनाचे
गोड मानूनी घ्या रसिकहो शब्द माझे स्वागताचे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎇दिप प्रज्वलनासाठी आमंत्रित करताना वापरायची चारोळी
जीवनाला हवी असते प्रकाशाची साथ
अज्ञानाचा अंधार जाळी समईतली वात
तेजू ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात
दीपप्रज्वलनाने करूयात कार्यक्रमाची सुरुवात
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎇दिपप्रज्वलन करीत असताना वापरायची चारोळी
दीपाच्या तेजाने उजळावी अमूची मती
कल्पनेला आकाश मिळावे, बुद्धीला मिळावी गती
विद्या दे, शक्ती दे, ज्ञान दे मां सरस्वती
➖➖➖➖➖➖➖➖➖
🎇मान्यवरांचे स्वागत करताना वापरायची चारोळी
कर्तुत्व ज्यांचे सागराप्रमाणे,
ज्ञान ज्यांचे हिमालयाप्रमाणे
फुलला हा सोहळा ज्यांच्या आगमनाने
स्वागत करूयात मान्यवरांचे,
शब्द सुमनांच्या पारिजाताने
➖➖➖➖➖➖➖➖➖
३. कार्यक्रमाचे प्रास्ताविक
४. अतिथींचे मनोगत
५. अध्यक्षीय समारोप
🎇यादरम्यान वापरायच्या चारोळ्या खालील प्रमाणे
🎇टाळ्यांचे आवाहन करणारी उपस्थित प्रेक्षकांसाठी चारोळी
प्रेम मिळतं, विश्वास मिळतो,
आपलेपणाची धारणा मिळते
रसिकहो तुमच्या टाळ्यांमधूनच
आम्हाला जगण्याची प्रेरणा मिळते
➖➖➖➖➖➖➖➖➖
कुणी पडत असेल तर हात द्यायला विसरू नका
रणांगणात शत्रूला मात द्यायला विसरू नका
विसरा सारं काही कालच, आजच, उद्याच पण
आजच्या कार्यक्रमात मात्र दाद द्यायला विसरू नका
➖➖➖➖➖➖➖➖➖
🎇अध्यक्षांच्या किंवा प्रमुख पाहुण्यांच्या भाषणानंतर वापरण्याची चारोळी
सामर्थ्य अमुच्या अंगी यावे
शब्द अपुले पेलण्याचे
भाग्य आम्हा लाभले
वकृत्व अपुले ऐकण्याचे
➖➖➖➖➖➖➖➖➖
🎇आभार प्रदर्शनाची सुरुवात करताना वापरण्याची चारोळी
ऋणानुबंधाच्या अशाच अपुल्या टिकून राहाव्या गाठी
निरोप घेऊ काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी
ओल असावी हृदयामध्ये, स्नेह असावा ओठी
समोर अपुल्या उभा आहे आभार प्रदर्शनासाठी
➖➖➖➖➖➖➖➖➖
🎇आभार प्रदर्शनात अतिथींचे आभार मानताना. वापरण्याची चारोळी
मातीच्या गोळ्याला देई नवे रूप कुंभार
सहजपणाने जन्मा येई नवा एक आकार
मार्ग सदा दाखवतील आम्हा तुमचे आजचे विचार
आपण आलात आज आपले मनापासून आभार
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🎇उपस्थितांचे आभार आणि कार्यक्रमाची सांगता करणारी चारोळी
हृदयातले भाव हे डोळ्यांनी बघून कळत नसतात
भावनांचे बंध हे रोज रोज जुळत नसतात
मिळतात येथे माणसे लाखोंनी हजारोंनी
पण तुमच्यासारखे रसिक हे रोज रोज मिळत नसतात




