बहारदार सूत्रसंचालन सांस्कृतिक कार्यक्रम| सत्कार प्रसंगी | चारोळ्या, सुंदर वाक्ये, कविता, अलंकारिक सुवचने marathi bahardar anchoringa
आपल्या सावलीपासून आपणच काहीतरी शिकावं…..
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावं…
शेवटी काय घेऊन जाणार आहोत ?
म्हणूनच जनसेवेच हे सुंदर लेणं प्रेमाने जपावं
असे आपले हे आदरणीय मार्गदर्शक……
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
कुणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं
कुणाच्यातरी काळजावर कोरलेलं सुंदर लेणं असतं
लोकसेवेचं, समाजसेवेचं देणं असत !
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अत्तराने कपड्याला सुगंधित करणे ही काय मोठी गोष्ट नाही.
आयुष्याची खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा आपले आयुष्य आपल्या कर्तबगारीने सुगंधित होते.
आपल्या कर्तुत्ववान कार्यशैलीतून स्वतः सोबतच
जनसामान्यांचे जीवन सुगंधित करणारे व्यक्तिमत्व ……
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अशा लोकांचा आदर करा जे त्यांच्या कामातून वेळ काढून तुम्हाला वेळ देतात………
आणि अशा लोकांवर प्रेम करा जे काम बाजूला ठेवून तुमच्या मदतीला येतात……..
अशाच आजच्या सत्कारमूर्ती…. यांचे सहर्ष स्वागत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आपल्या सावलीपासूनच आपण काहीतरी शिकावं
कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावं
शेवटी काय घेऊन जाणार आहोत
म्हणूनचजनसेवेचं हे सुंदर लेणं प्रेमाने जपावं
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
हारण्याची पर्वा कधी केली नाही.
जिंकण्याचा मोह ही केला नाही.
नशिबात असेल ते मिळेलच पण
प्रयत्न करणे कधी सोडणार नाही…
या विचारांनी प्रेरित असणारे आजचे विशेष अतीथी……..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ज्याच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला भिडतात
तो माणूस यशस्वी होतो पण आभाळाला हात लागूनसुद्धा,
ज्याचे पाय जमिनीवर असतात
तोच खरोखर मोठा माणूस ठरतो
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ओठांना जे जमत नाही ते फूल बोलतात…
मनातल्या नेमक्या भावना ते रंगामधून तोलतात….
मनातील शब्दफुलांना तर मांगल्याचा गंध असतो…
मनापासून सत्कार करण्यात खरच किती आनंद असतो…
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जर तुम्हाला एका वर्षाचे नियोजन करायचे असेल तर शेती करा
दहा वर्षांचे नियोजन करायचे असेल तर झाडे जगवा
आणि शंभर वर्षांचे नियोजन करायचे असेल तर माणसे जोडा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
तुमची संकल्पना असते नेहमी छान
त्याची अमंलबजावणीत ही असे शान
भविष्यात वटवृक्षाचे आपण होणार आहात सुवर्णपान…
असे श्रीमान………..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पाकळ्याच गळण म्हणजे फुलाच मरण असत,
मरताणाही सुंगध देण यातच आयुष्य सार असत,
अस आयुष्य जगण म्हणजे खरच सोन असत,
पण या आयुष्यात तुमच्या सारखे स्नेही मिळाले.
तर हे जगण सोन्याहून पिवळ असत असे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
काही माणसं मोठी असतात कर्तृत्वाने
काही माणसं मोठी असतात नेतृत्वाने
प्रकाशले हे सदन अशा माणसांच्या तेजाने
सत्कार करूयात मान्यवरांचा आदर भावाने
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
फुलांना शोभा नाही फुलहाराशिवाय.. सभेला शोभा नाही मान्यवरांशिवाय.. आजची सभा अपूर्ण वाटली असती ज्यांच्याशिवाय………
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माउली नंतर समाधी नाही
तुकोबा नंतर वैकुंठ गमन नाही
शिवराया नंतर छत्रपती नाही..
गंधर्वा नंतर गाणं नाही.
माशा नंतर पोहणं नाही.
रामा नंतर आचरण नाही..
रावना नंतर श्रीमंती नाही..
गरुडा नंतर भरारी नाही..
तुमच्या सारखे महान कार्य
पुन्हा नाही असे सत्कार मूर्ती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
फुले नित्य फुलतात..
ज्योती अखंड उजळतात..
आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात..
तोडणं हा क्षणाचा खेळ असतो
पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
गावोगावी ज्यांची किर्ती
अशा आजची सत्कारमूर्ती
त्यांच्या शुभ कार्यातून चला
आपण घेऊ स्फुर्ती ………
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
फुलांचा रंग आपण विसरू शकतो कधी त्याच उमलणही आपल्या लक्षात राहत नाही पण एखादा फुलाचा सुगंध जरी आला तरी त्याचं रंग-रूप उमलण्यासह डोळ्यापुढे उभं राहत, आम्ही आपल्या स्मरणात रहावं म्हणून प्रेमाचा सुगंध लाभलेल्या फुलांनी… सत्कार करीत आहोत…..
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
ज्यांची स्वप्ने दमदार असतात..
त्यानाच ध्येयप्राप्ती होते..
फक्त पंख असून काही फरक पडत नाही
मित्रानो जिद्दीमुळे उड्डाण सफल होते
असे आमचे यशस्वी सर्व श्री….
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
आपली माणसं आपलीच असतात…….
आपल्यासाठीच ती कष्टतात…….
म्हणूनच आपुलकीनं आपल्या माना त्यांच्यापुढं झुकतात
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाले..
श्रीकृष्णाच्या सहवासाने अर्जुन सर्वो श्रेष्ठ योध्दा झाले..
त्या प्रमाणे आज तुमच्या सहवासाने
आम्ही धन्य झालो असे आपले……………
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
एकमेकांना गुंफत धागा पुढे पुढे जातो
अन वस्रातून नवा आविष्कार जन्म घेतो
अतुट अशा स्नेहाच्या धाग्यांनी गुंफलेली आपली नाती
आणखी दृढ करण्याचा सुवर्णयोग जुळून आला आहे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
प्रेम से भरी हुई आंखे,
श्रद्धा से झुका हुआ सिर
सहयोग करते हुए हाथ,
सन्मार्ग पर चलते हुए पांव
और सत्य से जुड़ी हुई जबान
ईश्वर को बहुत पसंद है



