भारताचे मिसाईल मॅन,माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम misile man apj abdul kalam 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारताचे मिसाईल मॅन,माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम misile man apj abdul kalam 

(१५ ऑक्टोबर, १९३१ – २७ जुलै, २०१५)

भारताचे राष्ट्रपती व भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान (पृथ्वी, त्रिशूल, आकाश, नाग, अग्नी ही क्षेपणास्त्रे)

दक्षिण भारतात रामेश्वरम येथे १५ ऑक्टोबर, १९३१ रोजी अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. त्यांचे वडील फार शिस्तप्रिय होते. ते नावाड्याचा व्यवसाय करत असत. लहानपणापासून त्यांना वाचनाची फार आवड होती. घरचे वातावरण धार्मिक व आध्यात्मिक होते. डॉ. कलाम म्हणतात की, “माझ्या बाल्यावस्थेत शमसुद्दीन नावाच्या माझ्या एका दूरच्या भावाचा माझ्यावर बराच प्रभाव होता. रामेश्वरममध्ये येणाऱ्या वर्तमानपत्रांचा तो एक वितरक होता. रोज सकाळच्या रेल्वे गाडीने ‘पंबन’ गावाहून वृत्तपत्रांचे गठ्ठे येत. गावातल्या हजारभर सुशिक्षितांच्या वाचनाची गरज ‘भागवणाऱ्या शम सुद्दीनचा व्यवसाय म्हणजे एकखांबी तंबू होता. स्वांतत्र्याच्या चळवळीची वाटचाल गाववाल्यांना समजणे, हे महत्त्वाचे कार्य त्यातून साधत असे. कुणाला भविष्य जाणून घेण्यात रस असे, तर कुणी मद्रासच्या बाजारपेठेतले सोन्याचांदीचे भाव जाणून घेण्यास उत्सुक असत. तर

काही जण जिज्ञासू वृत्तीने हिटलर, महात्मा गांधी आणि बॅरिस्टर जिनांब‌द्दल गांभीर्याने चर्चा करत. कलाम आठ वर्षांचे असताना दुसरे महायुद्ध पेटले. काय कारण असेल ठाऊक नाही; पण त्या सुमारास बाजारात चिंचोक्यांना अचानक भरपूर मागणी आली. मी चिंचोके गोळा करून मशिदीजवळच्या एका दुकानात देत असे आणि अख्खा एक आणा कमवत असे. जलालुद्दीन मला युद्धाच्या कथा सांगत असे आणि मग ‘दिनमणी’च्या शीर्षकातून मी त्या शोधत राही. रोज सकाळी पंबनहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरला थांबेनाशी झाली. हा युद्धाचा आमच्या गावावर पहिला ठळक परिणाम होता. मग चालत्या रेल्वेगाडीतून वर्तमानपत्रांचे गठ्ठे रामेश्वर ते धनुषकोडीदरम्यान खाली फेकले जात.

ते गठ्ठे गोळा करण्यासाठी शमसु‌द्दीनला कुणीतरी मदतनीस हवा होता. माझ्यापेक्षा दुसरा योग्य उमेदवार त्याला कुठून मिळणार? माझ्या आयुष्यातली पहिली कष्टाची कमाई करायला शमसु‌द्दीनचा असा हातभार लागला. आज अर्धशतकानंतर मी वळून त्या क्षणांकडे पाहतो, आणि त्यावेळी स्वतःच्या कष्टाने मिळवलेल्या पहिल्या कमाईचा अभिमान आजही माझ्या मनात ओसंडून वाहू लागतो.

जलालुद्दीनसोबत त्यांची बहीण जोहरचा विवाह झाला होता. त्यांच्याकडून खूप चांगल्या गोष्टी डॉ. कलाम यांना कळत होत्या. ते सांगतात जलालुद्दीन मला नेहमी म्हणत असे की, आशावादी विचारांमध्ये एक शक्ती असते. जेव्हा घराच्या आठवणीने मी व्याकूळ होत असे, तेव्हा मी त्यांचे शब्द आठवत असे. त्यामुळे डॉ. अब्दुल कलाम मनामध्ये नेहमी आशावादी विचार करत असत, भविष्याब‌द्दल चांगलेच विचार

मनात आणत असत. त्यामुळे आपल्या विचारांच्या शक्तीचा भविष्यावर चांगला परिणाम होईल असे त्यांचे

प्रत्येक मूल जन्माला येताना आईवडिलांकडून काही जन्मजात वैशिष्ट्ये घेऊन येत असते. आजूबाजूच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक वातावरणात हळूहळू त्याच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते. या प्रवासात आपल्या जवळच्या खास व्यक्तींचा खूप प्रभाव पडतो. त्यांचे गुण व सवयी नकळत ग्रहण केल्या जातात.

डॉ. कलाम यांच्या वडिलांचा प्रामाणिकपणा, शिस्त आणि आईकडून चांगल्यावर विश्वास ठेवायची फार मोठा प्रभाव होता. आंतरिक शक्ती, दयाळूवृत्तीचा ठेवा त्यांच्या तिन्ही भावंडांनी उचलला. त्यांच्यावर सुब्रमण्यम अय्यर यांचा

रामनाथपुरला शिक्षण घेण्यासाठी जात असतानाचा प्रसंग त्यांनी सांगितला. वडिलांची परवानगी मागितली तेव्हा ते म्हणाले, “अबुल तुला मोठं व्हायचं असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवं. ‘सीगल पक्षी’ घरटे सोडून एकटे दूरवर उडत जातात आणि नवे प्रदेश शोधतात, तसे या मातीचा आणि रस्ता अडवणार नाही.” इथल्या स्मृतींचा मोह सोडून तुझ्या इच्छाआकांक्षा जिथे पूर्ण होतील, तिथे तुला जायलाच हवे. आम्ही तुझा

रामनाथपुरम मधल्या माध्यमिक शाळेत ते हळूहळू रमले. या शाळेत शिकवणारे एक शिक्षक श्री. इयादुराई सालोन एक आदर्श गुरू होते. ते म्हणतात, “माझ्या तरुण उत्साही मनाला समोर फुटणाऱ्या असंख्य वाटा मोहून टाकत. त्यातली कुठली निवडावी, असा संभ्रम पडला होता. त्यांनी मला योग्य दिशा दाखवली.” त्यांचे गुरूंशी खूप घट्ट नाते होते. त्यांच्यांकडून ते महत्त्वाच्या गोष्टी शिकले. आपल्या हातून घडणाऱ्या कृती, आपले विचार, आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर एक प्रकारचा ताबा ठेवू शकतात. ते नेहमी म्हणायचे, “आयुष्यात यशस्वी होण्यासाठी

तीन महत्त्वाच्या गोष्टी आपण समजून घ्यायला हव्यात. पहिली म्हणजे माणसाला इच्छा हवी. महत्त्वाकांक्षा हवी, दुसरी तिचा ध्यास घ्यायला हवा आणि तिसरी म्हणजे ती पूर्ण होईल, असा दृढ विश्वास हवा.” जीवनात यशस्वी होण्यासाठी हा खूप महत्त्वाचा मंत्र त्यांना मिळाला. त्यांना बालपणापासून पक्ष्यांचे उडणे अतिशय रम्य, गूढ, आहे, असे वाटायचे. सीगल पक्षी आणि

बगळे पंख पसरून आकाशात झेपावताना ते विस्मयाने पाहत असत. डॉ. कलाम म्हणतात, “माझ्या कोवळ्या मनात त्या वेळी त्यांच्यासारखा आपणही आकाशात विहार करावा, अशी इच्छा सरसरून जागी व्हायची. मी मनाशी म्हणत असे, एक दिवस मी देखील आकाशात अशी झेप घेईन आणि खरोखरच विमानात बसून आकाशात झेपावणारी रामेश्वरम मधील पहिली व्यक्ती मी होतो.” ‘इच्छा तिथे मार्ग’ अशा प्रकारे रामनाथपुरम येथील शाळेत शिक्षण झाल्यावर सेंट जोसेफ कॉलेजमध्ये महाविद्यालयात शिक्षण झाले. याच काळात इंग्रजी साहित्य, तत्त्वज्ञान आणि पदार्थविज्ञान या विषयांची त्यांना गोडी लागली. एम.आय.टी. इंजिनिअरिंग कॉलेजात त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले. ‘एरोडायनॅमिक्स्’ शास्त्रात त्यांनी अभ्यास केला. हिंदुस्थान एरोनॉटिक्समधून शिक्षण संपवून ते ‘एरोनॉटिक इंजिनिअर’ म्हणून बाहेर पडले. १९५८ साली हवाई

निर्देशालयात नागरी उड्‌डाण शाखेअंतर्गत त्यांची तंत्रज्ञ विभागात नेमणूक झाली. तेथे त्यांनी हॉवरक्राफ्ट मशीन बनविले.

१९६२ साली केरळ मधील त्रिवेंद्रम् जवळच्या ‘थुबा’ येथे अंतराळ संशोधन संस्था स्थापन झाली. तेथे अग्निबाण प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. तत्पूर्वी डॉ. कलाम यांनी अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे ‘नासा’ संशोधन केंद्रात, अवकाश तंत्रज्ञान संशोधनाचे प्रशिक्षण घेतले. तेथून पुन्हा ‘थुबा’ येथे परत आल्यावर १९६३ मध्ये अग्निबाण प्रक्षेपण करण्यात आले. ‘रोहिणी’ हा अग्निबाण विकसित झाला. तेथे डॉ. विक्रम साराभाई या शास्त्रज्ञांचा मोठा प्रभाव डॉ. कलाम यांच्यावर पडला. १९६२ व १९६५ साली चीन व पाकिस्तान यांच्याबरोबर युद्ध सुरू झाल्यावर शस्त्रास्त्र व युद्ध सामग्रीच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण बनविण्याच्या दृष्टीने जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे बनविण्याच्या कार्यात डॉ. कलाम यांचा सहभाग मोठा होता. १९६८ साली इस्रो (Indian Space Research Organization) ची स्थापना झाली. एस.एल.व्ही-३ या उपग्रह प्रक्षेपणाची जबाबदारी त्यांनी अत्यंत कुशलतेने पार पाडली. ते एस.एल.व्ही-३ प्रकल्पाचे प्रमुख बनले. तेव्हा तेथे काम करताना त्यांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रांतील बरीच रहस्ये उकलत गेली. १८ जुलै, १९८० ला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी ‘श्रीहरिकोटा’ येथील अवकाश तळावरून आपल्या भारताचे पहिले उपग्रह प्रक्षेपण वाहन उचलले गेले. ‘रोहिणी’ हा उपग्रह आपल्या कक्षेत शिरण्यापूर्वी सहाशे सेकंद संगणकाच्या पडदयावर चौथ्या टप्प्याच्या भागाला योग्य तो वेग मिळाल्याची सूचना मिळाली. त्यानंतर दोन मिनिटांत ‘रोहिणी’ उपग्रह कक्षेमध्ये योग्य तन्हेने फिरू लागल्याचा संदेश आला, संगणकाच्या टकटकीमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातले सर्वांत महत्त्वाचे शब्द उच्चारले, “मिशन डायरेक्टर कॉलिंग ऑल स्टेशन्स. एक महत्त्वाची घोषणा करायची आहे. अवकाश वाहनांच्या तिन्ही टप्प्यांचे काम सुरळीत झालेले आहे. चौथ्या टप्प्याच्या अपोजी मोटरने ‘रोहिणी’ उपग्रहाला योग्य तो वेग देऊन ठरलेल्या कक्षेमध्ये यशस्वी अवतरण केले आहे.” चारही बाजूंनी अत्यानंदाने अभिनंदनाचा वर्षाव झाला. राष्ट्राने पाहिलेले एक स्वप्न त्यांच्या प्रयत्नांमुळे पूर्ण झाले. देशाच्या इतिहासात एका नव्या पर्वाची सुरुवात होत असल्याची ती नांदी होती. प्रोफेसर सतीश धवन हे इस्रोचे चेअरमन, त्यांनी आपल्या संयमी, सावध शब्दांमध्ये, “अवकाशाचा वेध घेणे देशाल शक्य होईल,” अशी घोषणा केली.

भारतीय अंतराळ संशोधनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. वैज्ञानिक संशोधन हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असले, तरी ते निसगप्रेमी होते. ते म्हणतात, “विमानातून उडताना खाली दिसणारी पृथ्वीची सुंदर रूपे पाहणे आणि सर्व विसरून चिंतनात मग्न होणे, मला नेहमीच आवडते. उंच अंतरावरून एकमेकांत नीट गुंतलेली झाडे, जमीन, नद्या, झरे, टेकड्या, फार शांत आणि सुरेख दिसतात. जिल्ह्यांच्या, राज्यांच्या, देशाच्या सीमा कुठे गायब होतात, हेच मला कळत नाही.”

१९८२ साली डी.आर.डी.ओ च्या प्रमुख संचालकपदी डॉ. कलाम यांची नेमणूक झाली. तेथे त्यांनी क्षेपणास्त्रे विकास कार्यक्रमाची आखणी केली. तेथे ‘पृथ्वी’ हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र पायदळाकडे, पृथ्वी-२ वायुदलाकडे, पृथ्वी-३ नौदलाकडे सोपवण्यात आले तर युद्धात डावपेचांसाठी

वापरले जाणारे ‘त्रिशूल’ हे क्षेपणास्त्र, जमिनीवरून अवकाशात मारा करणारे, ‘आकाश’ हे क्षेपणास्त्र रणगाडाभेदी, ‘नाग’ हे क्षेपणास्त्र आरएक्स तंत्रज्ञान वापरून बनवलेले, ‘अग्नी’ हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले. या क्षेपणास्त्र निर्मितीमुळे भारत लष्करी सामर्थ्याच्या दृष्टीने सुरक्षित झाला. प्रकल्पातील साऱ्या घटनांचा एकत्रित विचार करून ते त्यांनी यशस्वी करून दाखविले. डॉ. विक्रम साराभाईंच्या प्रभावाने डॉ. कलाम यांच्यासारख्या अभियंत्याची ही ‘अवकाश झेप’ यशस्वी गाथा होती. एकात्मिक लक्षवेधी क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाच्या यशानंतर डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम काही काळ सुरक्षाखात्याचेही वैज्ञानिक सल्लागार आणि संरक्षण संशोधन, विकास संस्थेचे प्रमुख म्हणून कार्यरत राहिले. मे १९९८ मध्ये अणुऊर्जा विभागाच्या सहयोगाने केलेल्या पोखरणच्या अणुचाचणी शक्ती कार्यक्रमात ते गुंतले होते. पोखरणच्या दुसऱ्या अणुचाचण्यांच्या यशानंतर डॉ. कलाम अनेक भारतीयांचा ‘कंठमणी’ बनले. नोव्हेंबर १९९९ ते २००१ नोव्हेंबर पर्यंत त्यांनी भारत सरकारचे ‘वैज्ञानिक सल्लागार’ म्हणून काम पाहिले. हे पद कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांच्या स्तरावरचे होते. देशाच्या विकासासाठी धोरणे, पद्धती व कार्यक्रम राबविणे, ही त्यांची जबाबदारी होती. २०२० सालापर्यंत विज्ञान-तंत्रज्ञान दृष्टिकोन त्यांनी विकसित केला. भारताला सध्याच्या विकसनशील राष्ट्रापासून ते विकसित राष्ट्र म्हणून दर्जा प्राप्त करून देत ‘भारत एक महासत्ता’ बनण्याचा आराखडा त्यांनी तयार केला.

डॉ. कलाम यांना १९८१ साली पद्मभूषण, १९९० साली पद्मविभूषण आणि १९९७ साली सर्वाच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ असे पुरस्कार बहाल करण्यात आले. इसवी सन २००२ मध्ये भारतीय प्रजासत्ताकाचे ते ११ वे ‘राष्ट्रपती’ बनले. ‘राष्ट्रपती’ म्हणून त्यांची कारकीर्द यशस्वी झाली. ‘मिसाईल मॅन’ म्हणून त्यांनी वेगळी छाप पाडली. विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुरेख समन्वय त्यांनी आपल्या जीवनात घातला. ‘अग्निपंख’ मध्ये ते म्हणाले, “माझे आयुष्य इतरांना आदर्श वाटावे, असे मी म्हणत नाही; पण मला विश्वास आहे की काही जणांना प्रेरणा मिळेल. आंतरिक समाधान हेच अत्युच्च कोटींचे समाधान आहे, असे त्यांना पटेल. देवाची असीम कृपा हा प्रत्येकाचा वारसा आहे, हे समजून येईल.” डॉ. कलाम यांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्या देशाला अर्पण केले. ते अविवाहित होते. विद्यार्थ्यांकरिता त्यांचे विचार खूप प्रेरणादायी असायचे. भाषण करताना त्यांच्या शब्दांत आपुलकी भरलेली असायची. त्यांचा मृत्यू २७ जुलै, २०१५ ला हिरावून नेले, पण त्यांच्या कार्य व कर्तृत्वामुळे ते अमर झाले. कार्यक्रम सुरू असतानाच झाला. सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या असतानाच मृत्यूने त्यांना आपल्यातून

तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार जागेपणी स्वप्नं पाहून दिला जीवना आकार उदात्त विचार नेक बाणा, कष्ट घेतले हो फार

आम्हावरी आपले सदा राहतील उपकार

Related posts:

1 thought on “भारताचे मिसाईल मॅन,माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम misile man apj abdul kalam ”

Leave a Comment