प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “शकुंतला देवी ” bhartiy ganittadnya Shakuntala Devi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “शकुंतला देवी ” bhartiy ganittadnya Shakuntala Devi

शकुंतला देवी Shakuntala Devi (1929-2013) जीवन परिचय : शकुंतला देवी यांचा जन्म ४ डिसेंबर, १९२९ ला बंगळुरू येथे झाला. त्यांची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची होती. त्यांचे वडील सर्कसमध्ये काम करत असत. गरिबी असल्याने त्यांना औपचारिक शिक्षणदेखील पूर्ण करता आले नाही. इतक्या समस्या असूनही त्यांच्या प्रतिभेवर कोणताच परिणाम झाला नाही. त्या ३ वर्षांच्या असल्यापासूनच त्यांच्यातील प्रतिभा दिसू लागली होती. एकदा पत्ते खेळताना वडिलांनी त्यांच्यातील ही कला ओळखली होती. ६ वर्षांच्या असताना ‘मैसूर विद्यापीठ’ आणि ‘अन्नमलाई विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात त्यांनी आपल्या प्रतिभेने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. १९४४ मध्ये त्या वडिलांसोबत लंडनला गेल्या. येथूनच पुढे त्यांच्या प्रतिभेला खरी चालना मिळाली. त्यांना अमेरिकेतील विद्यापीठात देखील आमंत्रित करण्यात आले; जेथे अवघ्या मिनिटात उत्तरे देऊन त्यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केले. गणितासोबतच त्यांना लेखनाची देखील आवड होती. त्यांनी ज्योतिषशास्त्र आणि कोडी यांच्याशी संबंधित पुस्तके लिहिली. वर्ष १९६९ मध्ये शकुंतला यांना ‘वुमन ऑफ द ईयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना ‘रामानुजन पुरस्कारा’ने देखील सन्मानित करण्यात आले होते. ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये देखील त्यांचे नाव नमूद आहे. वर्ष २०१३ मध्ये या प्रतिभावान गणिततज्ज्ञ असलेल्या महिलेचे निधन झाले. २०२० मध्ये शकुंतला देवी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटदेखील आला होता. या चित्रपटात ‘विद्या बालन’ ने शकुंतला देवींची भूमिका साकारली होती. कार्य : त्या एक ‘मानवी संगणक’ म्हणूनच ओळखल्या जातात. त्यांनी २०१ अंक असलेल्या संख्येच्या 23 व्या रूटची गणना करण्यासाठी जगातील सर्वांत वेगवान संगणक, UNIVAC विरुद्ध स्पर्धा केली आणि १० सेकंदांनी ही स्पर्धा जिंकली. त्यांनी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’, १९८२ च्या आवृत्तीमध्ये स्थान मिळवले. शकुंतला देवींनी कॅल्क्युलेटरचा वापर न करता गणितातील सर्वांत गुंतागुंतीची समीकरणे सोडवली. त्यांनी आपल्या उत्कृष्ट बुद्धीने गणितात अनेक जागतिक विक्रम प्रस्थापित केले.

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ परिचय,कार्य, साहित्य, सर्व माहिती pdf उपलब्ध

अणु.क्र गणिततज्ञ परिचय/माहिती
आर्यभट्ट क्लिक करा 
वराहमिहिर क्लिक करा 
भास्कर (पहिले) क्लिक करा 
ब्रह्मगुप्त क्लिक करा 
महावीर क्लिक करा 
भास्कराचार्य (द्वितीय) क्लिक करा 
श्रीनिवास रामानुजन क्लिक करा 
पी.सी.महालनोबिस क्लिक करा 
सत्येंद्रनाथ बोस क्लिक करा 
१० डॉ.सी.आर.राव क्लिक करा 
११ शकुंतला देवी क्लिक करा 
१२ डी.आर.कापरेकर क्लिक करा 
१३ नरेंद्र करमरकर क्लिक करा 
१४   क्लिक करा 
     

Related posts:

1 thought on “प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “शकुंतला देवी ” bhartiy ganittadnya Shakuntala Devi”

Leave a Comment