प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “भास्कर (पहिले)” bhartiy ganittadnya bhaskar pahile
जीवन परिचय : ‘भास्कर (पहिले)’ हे सातव्या शतकातील भारतीय गणितज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते. बाराव्या शतकांतील गणिततज्ज्ञ भास्करापासून वेगळे करण्यासाठी त्यांना भास्कर (पहिले) असे समजले जाते, भास्कर (पहिले) हे ब्रह्मगुप्त आणि माधव समागमचे तीन मोत्यांपैकी एक मानले जातात. त्यांचा जन्म सातव्या शतकात महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील ‘बोरी’ येथे झाला. त्यांच्या वडिलांनी त्यांना खगोलशास्त्राचे शिक्षण दिले. ते निझामाबाद जिल्ह्यातील ‘अस्माका’ येथील गणिततज्ज्ञाच्या शाळेत काम करत असत. ते आर्यभट्टाचे अनुयायी होते, आर्यभट्टांच्या खगोलशास्त्रीय शाळेतील सर्वांत प्रसिद्ध विद्वानांपैकी एक मानले जात. आर्यभट्टांच्या खगोलशास्त्रातील कामावर त्यांनी संशोधन केले. त्यांनी साईन फंक्शनवर काम केले. साईनचे अधिक अंदाजे मूल्य दिले. आर्यभट्टांच्या लेखनावर कायमस्वरूपी प्रकाश टाकण्याचे काम भास्कर (पहिले) यांनी केले. इसवी सन ६८० साली ‘अस्मक’ (सध्याचे तेलंगणा आणि महाराष्ट्र) येथे त्यांचा मृत्यू झाला. या उच्चकोटीच्या गणिततज्ज्ञाच्या सन्मानार्थ ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ७ जून, १९७९ रोजी ‘भास्कर एक’ हा उपग्रह प्रक्षेपित केला. हा पहिला प्रायोगिक रिमोट सेन्सिंग उपग्रह आहे. कार्य : भास्कर (पहिले) यांनी तीन पुस्तके लिहिली. त्यात ‘आर्यभट्टीय भाष्य’ हे संस्कृतमध्ये लिहिलेले गणितावरील पुस्तक आहे. ‘लघुभास्करीय’ छोटे पुस्तक आहे. ‘महाभास्करीय’ हा त्यांचा महान ग्रंथ आहे. * ‘संस्कृत’ शब्दाऐवजी चिन्ह (अंक) वापरून त्यांनी ‘हिंदू-अरेबिक’ संख्याप्रणालीची निर्मिती केली. लहान वर्तुळाने शून्याचे चित्रण करणारे ते पहिले गणिततज्ज्ञ होते. त्यांनी आर्यभट्टांच्या कार्यावरील भाष्य ‘आर्यभट्टीय भाष्य’ या ग्रंथात केले. हा ग्रंथ त्यांनी ६२९ साली लिहिला. त्यात त्यांनी साइनच्या किमती कोणत्याही कलनाशिवाय, भूमितीचा वापर न करता अचूक पद्धतीने दिल्या. रेषीय समीकरणे उदाहरणांसहित तपशीलवार सोडवून दिली. चक्रीय चौकोनाची चर्चा त्यांनी केली; जो चौकोन ज्याच्या चारही बाजू समान नाहीत आणि कोणत्याही विरुद्ध बाजू समांतर नाहीत. आर्यभट्टाच्या कलाकृतीवर कायमस्वरूपी प्रकाश टाकण्याचे अमूल्य काम भास्कर (पहिले) यांनी केले, हे त्यांचे वैशिष्ट्य. ब्राह्मी अंकांचा वापर करून स्थानीय प्रणालीमध्ये संख्यांना स्थानात्मक प्रतिनिधित्व देणारे ते पहिले गणिततज्ज्ञ होते. * ‘महाभास्कर’ हे गणितीय खगोलशास्त्रावरील एक कार्य आहे, ज्यामध्ये गणितीय खक्षोलशास्त्राशी संबंधित आठ अध्याय आहेत. त्यामध्ये ग्रहांचे रेखांश, त्यांचे एकमेकांशी संबंध, वनस्पती आणि तारे यांच्यातील संयोग, चंद्र, चंद्रकोर, सूर्य आणि चंद्रग्रहण, ग्रहांचा उदय आणि अस्त यांसारखे मनोरंजक कार्य आहे. यांतील काही भाग नंतर अरबीमध्ये अनुवादित झाला.
प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ परिचय,कार्य, साहित्य, सर्व माहिती pdf उपलब्ध
| अणु.क्र | गणिततज्ञ | परिचय/माहिती |
| १ | आर्यभट्ट | क्लिक करा |
| २ | वराहमिहिर | क्लिक करा |
| ३ | भास्कर (पहिले) | क्लिक करा |
| ४ | ब्रह्मगुप्त | क्लिक करा |
| ५ | महावीर | क्लिक करा |
| ६ | भास्कराचार्य (द्वितीय) | क्लिक करा |
| ७ | श्रीनिवास रामानुजन | क्लिक करा |
| ८ | पी.सी.महालनोबिस | क्लिक करा |
| ९ | सत्येंद्रनाथ बोस | क्लिक करा |
| १० | डॉ.सी.आर.राव | क्लिक करा |
| ११ | शकुंतला देवी | क्लिक करा |
| १२ | डी.आर.कापरेकर | क्लिक करा |
| १३ | नरेंद्र करमरकर | क्लिक करा |
| १४ | क्लिक करा | |











2 thoughts on “प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “भास्कर (पहिले)” bhartiy ganittadnya bhaskar pahile ”