प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “पी.सी.महालनोबिस” bhartiy ganittadnya Prasant Chandra Mahalanobis

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “पी.सी.महालनोबिस” bhartiy ganittadnya Prasant Chandra Mahalanobis

पी.सी.महालनोबिस जीवन परिचय: प्रशांत चंद्र महालनोबिस म्हणजेच पी. सी. महालनोबिस यांचा जन्म २९ जून, १८९३ रोजी कोलकाता येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प्रबोधचंद्र होते. विचारवंत आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय असणाऱ्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण ‘ब्राह्मो बॉईज स्कूल’मध्ये झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण ‘प्रेसिडेंसी कॉलेज’ येथे झाले. या कॉलेजमधून १९१२ मध्ये भौतिकशास्त्र विषय घेऊन त्यांनी विज्ञानशाखेमधील बी.एस्सी. ही पदवी मिळविली. पुढे १९१३ मध्ये लंडन विदयापीठात प्रवेश घेण्यासाठी ते लंडनला गेले, पण ट्रेन चुकल्याने केंब्रिज किंग्स महाविदयालयामध्ये असणाऱ्या मित्राकडे ते राहिले. पुढे याच महाविदयालयामधून त्यांनी गणित व भौतिकशास्त्र विषयांत ‘ट्रायपॉस’ ही परीक्षा उत्तीर्ण केली. तेथे त्यांनी सीटीआर विल्सनसोबत ‘कॅव्हेंडिश’ प्रयोगशाळेत काम केले. त्यानंतर मोठी सुट्टी घेऊन ते भारतात परतले. कोलकाता येथील प्रेसिडेंसी कॉलेजचे प्राचार्य यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांनी महालनोबीस यांना महाविदयालयामध्ये तासिका घेण्यासाठी आमंत्रित केले. पुढे त्यांनी या महाविदधालयांमध्ये प्राध्यापक म्हणून काम केले. येथे शिकवण्यात ते रममाण झाले. त्यांनी हवामानशास्त्र व मानववंशशास्त्र या विषयांचाही अभ्यास केला. या विषयातील समस्यांची आकडेवारीची उपयुक्तता त्यांनी शोधून काढली. पुढे त्यांना ‘संख्याशास्त्र’ या विषयात संशोधनाला गती मिळाली. कोलकाता येथे २७ फेब्रुवारी, १९२३ रोजी ‘निर्मल कुमारी’ यांच्याशी त्यांचा विवाह झाला. १९४४ ला त्यांना ‘वेलडॉन मेमोरियल प्राईज’ मिळाले, १९६८ ला त्यांना भारत सरकारतर्फे ‘पद्मविभूषण’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ही खच्या अर्थाने त्यांनी केलेल्या अमूल्य अशा कामाची पावती होती. कार्य : त्यांना सांख्यिकीय मोजमाप, महालनोबिस अंतरा’साठी लक्षात ठेवले जाते. * ‘महालनोबिस अंतर’ हे बहुविध परिमाणांमधील मोजमापावर आधारित वितरणातून किती बिंदू वळवते, हे शोधण्यासाठी सर्वाधिक वापरले जाणारे मेट्रिक आहे. त्यांनी ‘पायलट’ आणि मोठ्या प्रमाणांवरील सर्वेक्षणाची संकल्पना मांडली. सांख्यिकी क्षेत्रात एक महान योगदान दिले. सांख्यिकीतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानामुळे, त्यांना ‘भारतीय सांख्यिकी जनक’ म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी भारतीय सांख्यिकी विज्ञान संस्थेची स्थापना केली. * ते भारताच्या पहिल्या नियोजन आयोगाचे सदस्य होते. * औदयोगिकीकरणावर लक्ष केंद्रित करणारी भारताची दूसरी पंचवार्षिक योजना महालनोबिस मॉडेलवर तयार करण्यात आली आहे. महालनोबिस अंतर, फेल्डमन-महालनोबिस मॉडेलसाठी ते ओळखले जातात.

प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ परिचय,कार्य, साहित्य, सर्व माहिती pdf उपलब्ध

अणु.क्र गणिततज्ञ परिचय/माहिती
आर्यभट्ट क्लिक करा 
वराहमिहिर क्लिक करा 
भास्कर (पहिले) क्लिक करा 
ब्रह्मगुप्त क्लिक करा 
महावीर क्लिक करा 
भास्कराचार्य (द्वितीय) क्लिक करा 
श्रीनिवास रामानुजन क्लिक करा 
पी.सी.महालनोबिस क्लिक करा 
सत्येंद्रनाथ बोस क्लिक करा 
१० डॉ.सी.आर.राव क्लिक करा 
११ शकुंतला देवी क्लिक करा 
१२ डी.आर.कापरेकर क्लिक करा 
१३ नरेंद्र करमरकर क्लिक करा 
१४   क्लिक करा 
     

Related posts:

1 thought on “प्रसिद्ध भारतीय गणिततज्ञ “पी.सी.महालनोबिस” bhartiy ganittadnya Prasant Chandra Mahalanobis”

Leave a Comment